पंढरपूर LIVE 9 जानेवारी 2018
कुर्डुवाडीतील चलत व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्यात मुख्याध्यापक लक्ष्मीकांत डंके यांचे प्रतिपादन
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई व श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कुर्डुवाडी मधील नूतन हायस्कूलमध्ये चलत व्यवसाय मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला.‘स्वेरी शिक्षण संकुलाने आपल्या पंढरपूर पॅटर्नच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असणारी इंग्रजी भाषा व तंत्रशिक्षणाची भीती दूर केली असून ग्रामीण भागातील विद्यार्थी आता तंत्रशिक्षण घेवून स्पर्धा परीक्षेत आपली गुणवत्ता सिद्ध करत आहेत. तंत्र शिक्षणा मधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो हे ओळखून गोपाळपुरच्या माळरानावर वसलेल्या स्वेरीने संस्कारित विद्यार्थी घडविण्याचा वीडा उचलला आहे . डॉ. रोंगे सरांनी गोपाळपूरच्या माळरानावर ओएसिस निर्माण केले आहे.एकूणच स्वेरी शिक्षण संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या तंत्रशिक्षणाची कमतरता पूर्ण केली आहे.’ असे प्रतिपादन नूतन प्रशालेचे मुख्याध्यापक लक्ष्मीकांत डंके यांनी केले.
दीपप्रज्वलनानंतर डॉ.डी.एस. चौधरी यांनी प्रास्तविकात हा मेळावा आयोजित करण्याचा हेतू सांगितला. प्रा यशपाल खेडकर म्हणाले की, आज शिक्षणाच्या क्षेत्रात जिथे जास्त चांगले शिक्षण दिले जाते, तिथेच प्रवेशासाठी जास्त गर्दी होते. ज्या ठिकाणी शिकविलेच जात नाही त्या ठिकाणी प्रवेश घेणार कोण ? हा प्रश्न निर्माण होतो. यासाठी विद्यार्थ्यांनी भविष्यात तंत्र शिक्षणाच्या वाटा निवडताना काटेकोरपणे अभ्यास करणे गरजेचे झाले आहे.’ अधिष्ठाता डॉ. एस.एम.मुकणे यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी संभाषण, जिथे प्रवेश घ्यायचा आहे तेथे कोणकोणत्या सुविधा असाव्यात याबाबत मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांनी अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रीयेवर प्रकाश टाकून विद्यार्थी व पालकांनी महाविद्यालयात प्रवेश घेताना नेमके कोणत्या गोष्टीला प्रथम प्राधान्य द्यावे याबद्दल मार्गदर्शन केले. मोक्षदा भंडारे यांनी स्वेरीत शिक्षण घेत असताना आपला कसा विकास झाला व आपल्यावर कसे संस्कार घडले हे सांगून अवघड विषयांचे अधिक तास, कमवा व शिका योजना, वसतिगृहातील नियम व अभ्यासिकेद्वारे करून घेतला जाणारा अभ्यास व त्याचा भविष्यात होणारा फायदा तसेच मुलींच्या दृष्टीने संरक्षणाच्या माध्यमातून असणारी शिस्त व नियम यावर प्रकाश टाकला. उच्च विद्याविभूषित प्राध्यापकांच्या सहकार्याने हा मेळावा यशस्वीपणे पार पडला. या मार्गदर्शन मेळाव्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाचे महत्व समजले. या मेळाव्यात तंत्रशिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज व स्वयंरोजगारासाठी वित्तपुरवठ्याबद्धल मार्गदर्शन,प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन, विद्यार्थी व पालकांच्या शंकांचे निरसन करून तंत्र शिक्षणातील नोकऱ्यासंबंधी माहिती देण्यात आली. यामध्ये संयोजकांनी अप्रतिम नियोजन केल्याचे दिसून येत होते. यावेळी नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक लक्ष्मीकांत डंके यांच्यासह उपमुख्याध्यापिका ए.व्ही. मस्के, पर्यवेक्षक एस. के. यादव, ए.एस.कराडे, विजयकुमार कन्हेरे, एस.एन.बशेट्टी, व्ही.पी.म्हेत्रे, एस.आर. कांबळे,एस.सी. म्हमाणे, एस.एन.पाटील,सौ एस.व्ही कन्हेरे, एस.एस. टमके, के. पी. पाठक, एस.बी. शिरसट, पी.डी.कुबेर, एस.जे. दहिहंडे. प्रा.एम.एम.मोरे,प्रा. एम.ए. कुंभार, प्रा.सोमनाथ बागल आणि संतोष हलकुडे उपस्थित होते. या मेळाव्यात जवळपास ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्वेरीज पॉलिटेक्निकचे उपप्राचार्य व समन्वयक प्रा. एस.ए. बेहरे व सहसमन्वयक प्रा. एस.एम.कावळे यांनी समाधान व्यक्त केले.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com



