👁 7 Views

बीडच्या रोहितने घेतली रेशीम उद्योगातून भरारी

पंढरपूर LIVE 9 जानेवारी 2018
निलेश चाळक बीड: मनात इच्छा व कष्ट करण्याची तयारी असली की, यश हमखास मिळते. उच्च शिक्षणाचा उपयोग स्वत:च्या उद्योगासाठी करणाºया तरूणाांची संख्या तशी कमी आहे. वडिलो पार्जित जमीनीला अधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर रेशीम उद्योगातून तरूणांना चांगली भरारी घेता येऊ शकते, याचे उदाहरण पहायचे असेल तर बीडच्या रोहित लंबे या पंचेवीशीतील तरूणाचा रेशाीम उद्योग पहा. कृषी व्यावसायात स्थिरावू पहाणाºया तरूणांना रोहित लंबेच्या रेशीम उद्योगातून प्रेरणा मिळत आहे. 
गेवराई पासून २५ किमी अंतरावर असलेल्या सिरसमार्ग येथील रोहित परमेश्वर लंबे या तरूणाकडे एकूण ९ एकर जमीन आहे. वडिल पारंपारिक शेती करत होते. यामुळे पेरणीचा खर्च देखील निघत नव्हता. हे सर्व पाहिल्यानंतर बी. एस्सी. झालेल्या रोहित लंबे यांनी वडिलांकडे रेशीम शेतीचा प्रस्ताव मांडला. मात्र हा प्रस्ताव रोहितचे वडिल परमेश्वर लंबे यांनी फेटाळला. परंतु रोहितची रेशीम उद्योगाबाबतची जिद्द पाहून त्यांनी रेशीम उद्योग करण्यासाठी परवानगी दिली. याला तीन वर्षाचा काळ लोटला. दोन एकर क्षेत्रात रोहितने तुती लागवड केली. सुरूवातील संदिप मिटकरी हे जवळचे नातेवाईक आहेत. त्यांनी तुती लागवड केली होती. त्यांच्याकडून संपर्ण मार्गदर्शन घेतले. तुतीचे बेने मिटकरी यांच्याकडून घेतले. अंडी पुंज रेशीम उद्योग कार्यालयाकडून घेतले. यासाठी शेतात बावीस बाय साठ च्या जागेत सेड उभारले. पहिले सहा महिने तुतीची वाढ होण्यासाठी कालावधी लागला. त्यानंतर रेशीम उद्योग कार्यालयाकडून घेतलेले अंडी पुंज ची बॅच सुरू झाली. यातून तयार झालेल्या रेशीम कोषाची विक्री परराज्यात सुरू झाली.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *