👁 7 Views

शेतकरी गटांनी क्षेत्र व शेतकरी हिताचा विचार करावा – जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले

पंढरपूर LIVE 9 जानेवारी 2018
शेतकरी गटांनी क्षेत्र व शेतकरी हिताचा विचार करावा
    जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले
            सोलापूर दि.9 :- शेतकरी गटांनी केवळ अनुदानावर अवलंबून न राहता शेतकरी गटाच्या क्षेत्राचा व शेतकऱ्यांचा विचार करून गटाचे भाग भांडवल वाढवावे, गटाची प्रगती साधावी, असे आवाहन जिल्हाधिकारी        डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले.
             जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशिय सभागृहात कृषी विभागाकडील योजनांचा आढावा घेण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत  होते. यावेळी माजी कॅप्टन परदेशी, अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज बिराजदार, आत्माचे प्रकल्प संचालक श्री. बरबडे, रवींद्र माने यांच्यासह तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी, शेतकरी गटाचे प्रमुख उपस्थित होते.

             जिल्हाधिकारी म्हणाले, ‘शेतकऱ्यांची सर्वांगीन प्रगती करण्यासाठी गटाचे उद्दीष्ट, कार्य ठरवून काम करावे. शेतकरी समृध्द व आर्थिक दृष्ट्या मजबूत होण्यासाठी काम व्हावे. यासाठी गटामार्फत करण्यात येणाऱ्या बाबींचा सविस्तर प्रकल्प आराखडा तात्काळ सादर करावा. प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी तालुका कृषि अधिकारी यांनी गटांना मार्गदर्शन करावे’.
             यावेळी समूह शेती, ठिबक, तुषार सिंचन, प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, माती परीक्षण, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, मागेल त्याला शेततळे या योजनांचा आढावा घेण्यात आला. मागेल त्याला शेततळे योजनेचे उद्दीष्ट पूर्ण करावे. तसेच झालेल्या कामांचे फोटो त्वरित अपलोड करावेत अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी कृषि अधिकाऱ्यांना दिल्या.
*****
चिंच फळ लिलावासाठी
                                  इच्छुकांनी उपस्थित रहावे    
            सोलापूर दि.9 :- तालुका बीज गुणन केंद्र , मुळेगांव प्रक्षेत्रातील 37 चिंचेच्या झाडांच्या चिंच फळांचा लिलाव दिनांक 18 जानेवारी 2018 रोजी सकाळी 10.00 वाजता करण्यात येणार आहे.
            या लिलावात भाग घेवू इच्छिणाऱ्यांनी मुळेगांव प्रक्षेत्रावर उपस्थित रहावे. लिलावाच्या अटी, शर्ती बीज गुणन केंद्र, मुळेगांव येथे पाहाण्यास उपलब्ध आहेत, असे उपविभागीय कृषि अधिकारी, सोलापूर यांनी कळविले आहे.
*****
शिष्यवृत्तीचे अर्ज
पाठविण्याचे आवाहन
  सोलापूर दि.9 :- अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागास आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे सन 2015-2016 व 2016-2017 या शैक्षणिक वर्षातील अर्ज महाविद्यालयांनी समाज कल्याण कार्यालयाकडे 10 जानेवारी 2018 पर्यंत पाठवावेत असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त अमित घवले यांनी केले आहे.
सन 2015-16 व 2016-17 या शैक्षणिक वर्षातील अर्ज महाईस्कॉल ही वेबसाईट मे 2017 पासून बंद झाल्यामुळे अर्ज  प्रलंबित होते. परंतु महाईस्कॉल ही वेबसाईट नोव्हेंबर पासून पुर्नजिवित करण्यात आलेली आहे. प्रलंबित अर्ज जिल्हा कार्यालयाकडे पाठविण्याबाबत कळविण्यात आलेले होते. परंतु अद्यापही महाविद्यालय पातळीवर मोठ्या प्रमाणात अर्ज प्रलंबित आहेत. सदर प्रलंबित अर्ज महाविद्यालयांनी दि. 10.01.2018 पर्यंत पाठविण्यात यावे,  महाविद्यालयांनी मुदतीत अर्ज न पाठविल्यास व विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहील्यास त्याची जबाबदारी पूर्णपणे त्या संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांची राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असेही श्री. घवले यांनी कळविले आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *