👁 8 Views

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम कलाकार मारुती माळी यांची स्वेरीला सदिच्छा भेट


पंढरपूर LIVE 9 जानेवारी 2018
कोणतेही क्षेत्र असो परिश्रम केल्याशिवाय यश मिळत नाही.
          -वस्ताद मारुती माळी
पंढरपूर- ‘स्वेरीच्या विद्यार्थ्यांची सातासमुद्रापार होत असलेली झेप पाहून ग्रामीण भागातील मुले ही प्रगतीपथावर आहेत यावर विश्वास बसत नाही आणि विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरत असेलल्या प्राचार्य डॉ. रोंगे सरांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीचा प्रत्येक विद्यार्थी गरुडझेप घेताहेत ही बाब भविष्यात विकासाकडे होत असलेली वाटचाल आहे. नाटक असो, मालिका असो अथवा स्पर्धा परीक्षा असो कोणत्याही क्षेत्रात कठोर परिश्रम केल्यास यश पदरी पडतेच असे असताना येथील विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व संस्कार याचे रोवले गेलेले बीज हे भक्कम आहे. यामुळे येथील शिस्त व आदरयुक्त संस्कार देखील सातासमुद्रापार पंढरपूरची ओळख घेवून जाईल.’ असे प्रतिपादन वस्ताद मारुती माळी यांनी केले.      

       महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय झालेली ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेमधील राणादांच्या गुरूंची अर्थात वस्तादची भूमिका केलेले कलावंत मारुती माळी यांनी नुकतीच स्वेरीला सदिच्छा भेट देवून स्वेरीच्या यशाच्या वाटचालीची माहिती जाणून घेतली. प्रारंभी वस्ताद माळी यांचे स्वागत उपप्राचार्य प्रा. एस.एन. कुलकर्णी यांनी केले. वस्ताद तथा मारुती माळी वारकरी सांप्रदायातील असून ते प्रत्येक कार्तिकी वारीला पंढरपुरात येतात. परंतु आता मालिकेतील व्यस्त कामातून वेळ मिळताच ते पुंडलिकाच्या भेटीला पंढरपुरात येतात. मालीकेच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे वस्ताद माळी यांना तोंडावर रुमाल बांधून यावे लागते. त्यातूनही कोणी ओळखलेच तर त्यांना गराडा घालून वेळप्रसंगी उत्साहाने घरी नेतात आणि मालिकेची माहिती जाणून घेतात. भक्तांचा विठ्ठल पाहून झाल्यानंतर शिक्षणातील विठ्ठल पाहण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. गोपाळपुरातील श्रीराम माने याच्या आग्रहावरून ते स्वेरीत आले होते. त्यांनी संपूर्ण कॅम्पस पाहून अभियांत्रिकी, फार्मसी व एम.बी.ए, संशोधन विभाग, वसतिगृह आदी महत्वपूर्ण असणाऱ्या बाबींना भेट देवून माहिती जाणून घेतली. त्यांच्या सोबत अजय शिंदे, ओंकार गुरव व ऋषिकेश गुरव हे देखील होते. वस्ताद पुढे  म्हणाले ‘मी पंढरीच्या विठ्ठलाचा भक्त आहे आणि आता शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी घौददौड करत असलेल्या स्वेरीणे केलेल्या  परिश्रमातून उभा राहिलेल्या संकुलातील विद्यार्थ्यांची भरारी व त्यांची यशोगाथा ऐकली. पुर्वी स्वेरीचे नाव ऐकले होतो आणि आता परिश्रम आणि संस्काराच्या शिदोरीवर उभे असलेल्या शैक्षणिक नंदनवनाच्या प्रेमात पडलो. तसेच येथील मध्यवर्ती असलेल्या ओपन अँम्पी थिएटरमध्ये दरवर्षी चालणाऱ्या बीट्स या स्नेह संमेलनामधून विद्यार्थी आपल्यातील कलावंत जागा करतात. विद्यार्थ्यांना तयारी करण्यासाठी कमी कालावधी असतानाही त्यांच्यात असणारे सुप्त कला प्रकारामुळे विद्यार्थी भविष्यात अभिनयात देखील करिअर करु शकतील.’ असे सांगून स्वेरीमधून मिळणाऱ्या शिक्षणातून विद्यार्थ्यामध्ये होत असलेल्या प्रगतीवर समाधान व्यक्त केले. यावेळी सांस्कृतिक विभागप्रमुख, प्रा. करण पाटील,रजिस्ट्रार राजेंद्र झरकर, नागेश ताडे, शिरीष भोसले, मिलिंद कोकणे, योगेश कदम, हनुमंत डोंगरे, सुजित गायकवाड, शेखर चव्हाण, समाधान मोरे, निलेश कुलकर्णी, मधुकर मोरे, मनोज गावंदरे, संतोष हलकुडे आदी उपस्थित होते.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *