पंढरपूर LIVE 9 जानेवारी 2018
मंत्रिमंडळ बैठक : दि.9 जानेवारी 2018
एकूण निर्णय-3
विद्यापीठ अधिनियमात दुरुस्तीचा
अध्यादेश पुनर्प्रख्यापित करण्यास मान्यता
राज्यातील अकृषी विद्यापीठांनी आगामी शैक्षणिक वर्षाकरिता सादर केलेल्या बृहत आराखड्यांची अंमलबजावणी सुलभ व्हावी यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमात दुरुस्तीचा अध्यादेश पुनर्प्रख्यापित करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
विद्यापीठ अधिनियमानुसार विद्यापीठांनी तयार केलेल्या सम्यक योजनेस (बृहत आराखडे) महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची मान्यता घेण्यात येते. त्यानुसार राज्यातील अकृषी विद्यापीठांनी 2018-19 या शैक्षणिक वर्षासाठी सादर केलेले आराखडे आयोगाच्या बैठकीत मान्य करण्यात आले. आराखड्यातील विविध बाबींची सखोल छाननी करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने आपला अहवाल शासनास सादर केला आहे. या अहवालास आयोगाकडून मान्यता घेणे आवश्यक असते. या मान्यतेनंतर त्यानुसार प्रस्ताव मागविण्यात येतील. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी नवीन महाविद्यालय आणि संबंधित परिसंस्थांबाबतच्या वेळापत्रकात सुधारणा करणे आवश्यक ठरल्याने अधिनियमात दुरुस्ती करण्यात येणार आहे.
यासंदर्भात 11 डिसेंबर 2017 रोजी प्रख्यापित करण्यात आलेल्या अध्यादेशाचे अधिनियमात रुपांतर करण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडण्यात आले. विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलेले विधेयक विधानपरिषदेत मंजूर होऊ शकले नाही. परिणामी अध्यादेशाचे कायद्यामध्ये रुपांतर झाले नाही. त्यामुळे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम-2016 मध्ये सुधारणा करण्यासाठी प्रख्यापित केलेला अध्यादेश पुनर्प्रख्यापित करण्यात येत आहे.
या दुरुस्तीनुसार विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत मागासवर्गीयांतील विविध प्रवर्गासाठी चक्राकार (रोटेशन)पद्धतीने आरक्षण निश्चित करणे, विद्यापीठाच्या प्राधिकरणावर सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 30 नोव्हेंबरची मुदत 28 फेब्रुवारी 2018 पर्यंत वाढविणे, विद्यार्थी परिषदेच्या स्थापनेसाठी अधिनियमात सुधारणा करणे आदींबाबत तरतुदी समाविष्ट केल्या जातील. त्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 30(4), कलम 62(2), कलम 99, कलम 109(3)(क), 109(3)(ग), 109(3)(घ) व कलम 146 मध्ये सुधारणा करण्याकरिता अध्यादेश काढण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
—–०—–
दिवाणी प्रक्रिया संहिता-1908 मध्ये सुधारणा
न्यायालयीन प्रकरणांची प्रलंबितता
कमी करण्यासाठी अधिनियमात सुधारणा
न्यायालयीन वाद प्रकरणांच्या प्रलंबिततेसह एकाच प्रयोजनासाठी वारंवार केल्या जाणाऱ्या अर्जांवर निर्णय देण्याचे न्यायालयाचे काम कमी करण्यासाठी दिवाणी प्रक्रिया संहिता-1908 मधील कलम 9(क) वगळण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच यासंबंधीचा अध्यादेश प्रख्यापित करण्यासही मंजुरी देण्यात आली.
बदलत्या परिस्थितीत न्यायालयीन प्रकरणे निकाली काढण्याच्या मार्गात कलम 9 (क) हे मोठा अडथळा बनले आहे. कलम 9-क खाली मुद्दा उपस्थित केला गेल्यास जोपर्यंत न्यायालय निष्कर्षापर्यंत येऊन अंतिम निर्णय देत नाही तोपर्यंत संबंधित अर्ज न्यायालयाकडे प्रलंबित राहतो. परिणामत: दिवाणी दावा वर्षानुवर्षे प्रलंबित राहतो व अंतरिम निर्णय हाच अंतिम निर्णय असल्याचे भासते. त्याचप्रमाणे अशा प्रकारचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर एकदा प्राथमिक मुद्दयावर व दुसऱ्यांदा उर्वरित मुद्द्यांवर अशी दोन वेळा सुनावणी घ्यावी लागते. प्रत्येक मुद्द्यावर पुन्हा अपिल व विशेष अनुमती याचिका दाखल होतात. या सर्व बाबींमुळे वेळ व साधनांचा अपव्यय होऊन न्यायालयावर कामाचा दुप्पट भार पडतो. त्यामुळे न्यायालयीन वाद प्रकरणांची प्रलंबितता आणि न्यायालयाचे काम कमी करण्यासाठी दिवाणी प्रक्रिया संहिता-1908 मधील कलम 9(क) वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.
—–०—–
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
—–०—–
उच्च न्यायालयात माहिती तंत्रज्ञानासंबंधी
दोन पदांच्या निर्मितीस मान्यता
मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर प्रबंधक व उपप्रबंधक (माहिती तंत्रज्ञान) संवर्गातील प्रत्येकी एका पदाची निर्मिती करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
मुंबई उच्च न्यायालयासह त्यांची खंडपीठे आणि राज्यातील दुय्यम न्यायालयांच्या कामकाजात डिजिटल केस डिस्प्ले, सेंट्रलाईज्ड ई-फायलिंग सिस्टिम, ई-कोर्ट प्रोजेक्ट यासारख्या बाबींमुळे माहिती तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर नियमित स्वरुपात निर्माण करावयाच्या तांत्रिक संवर्गातील 11 पदांपैकी प्रबंधक व उपप्रबंधक (माहिती तंत्रज्ञान) या पदांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी येणाऱ्या वार्षिक 21 लाख 19 हजार 748 रुपये इतक्या आवर्ती खर्चास मान्यता देण्यात आली.
—–०—–
वृ.वि. 86 19 पौष,1939 (सायं.5.20 वा.)
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
मराठी भाषा विभागामार्फत मंत्रालयात ग्रंथप्रदर्शन
मुंबई, दि. 9 : मराठी भाषा विभागामार्फत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात दि. 10 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत ग्रंथप्रदर्शनाचे ¬आयोजन करण्यात आले आहे.
मराठी भाषा विभागामार्फत ग्रंथ प्रदर्शनाबरोबरच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 10 जानेवारी रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ‘चालता बोलता मराठी भाषेसदंर्भात प्रश्नमंजुषा कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला आहे. तर 11 जानेवारी रोजी संकल्प कलामंचमार्फत ‘शब्दांचे धन’ हा कार्यक्रम दुपारी 4 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत सादर करण्यात येणार आहे. यामध्ये अभिवाचन, नाट्यछटा, काव्यवाचन, संगीत आणि नृत्य आदिंचा समावेश आहे. 12 जानेवारी रोजी विधानभवनातील पहिल्या मजल्यावरील वार्ताहर दालनात मराठी विकीपिडीया प्रशिक्षण कार्यक्रम असणार आहे.
मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व संवर्धनासाठी 1 ते 15 जानेवारी या कालावधीत `मराठी भाषा संवर्धन पंधरवडा` मराठी भाषा विभागामार्फत साजरा करण्यात येत आहे. या पंधरवड्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन राज्यभरात करण्यात आले आहे.
००००
वृ.वि. 87 19 पौष,1939 (सायं.5.30 वा.)
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
—–०—–
जिल्हास्तर युवा पुरस्काराकरिता 15 जानेवारीपर्यंत प्रस्ताव पाठवा
मुंबई, दि. 9 : युवकांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवक-युवती आणि सामाजिक संस्थांना क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत दिल्या जाणाऱ्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी 15 जानेवारीपर्यंत प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
सन 2016-17 व सन 2017-18 या दोन वर्षाकरिता 2 युवक, 2 युवती आणि 2 संस्था असे एकूण 6 पुरस्कार देण्यात येणार असून जिल्ह्यातील युवकांनी व सामाजिक संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्याकरिता प्रोत्साहन देण्यासाठी हे जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतात.
पुरस्कार पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे :
युवक/युवती पुरस्कार :
पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करणाऱ्याचे वय 13 वर्षे पूर्ण 35 वर्षाच्या आत असले पाहिजे.
अर्जदाराचे मुंबई शहर जिल्ह्यात सलग 5 वर्षे वास्तव्य हवे.
युवकांसाठी केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे,चित्रफीत व फोटो जोडावेत.
केंद्र, राज्य शासन, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी, विद्यापीठांतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक/कर्मचारी पुरस्कारासाठी अपात्र ठरतील
संस्था युवा पुरस्कार :
सदर संस्था नोंदणीनंतर 5 वर्षे कार्यरत पाहिजे, संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1860 किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950 नुसार नोंदणीकृत असावी, गुणांकनाकरिता संस्थेने केलेल्या कार्याचे वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफीत व फोटो जोडावेत.
जिल्हास्तर युवा पुरस्काराकरिता इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज दिनांक 15 जानेवारी 2018 पर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, 2 रा मजला, धारावी सायन (पश्चिम), धारावी, मुंबई-17 येथे सादर करावेत.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
—–०—–
००००
वर्षा फडके, मुंबई 8 जानेवारी 2018
वृ.वि. 83 19 पौष,1939 (दु.4.10 वा.)
श्री क्षेत्र गहिनीनाथ, श्री क्षेत्र नारायणगड आणि श्री संत मुक्ताई मंदिर
59.08 कोटीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता
मुबंई, दि. 9 : बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथ व श्री क्षेत्र नारायणगड आणि जळगाव जिल्ह्यातील श्री संत मुक्ताई मंदिर कोथळी या ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या एकूण 59.08 कोटीच्या विकास आराखड्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मान्यता दिली.
बीड जिल्हयातील श्री क्षेत्र नारायणगड या ब वर्ग तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 25 कोटीच्या विकास आराखड्यातून मंदिर परिसरात दगडी फरशी बांधकाम, सार्वजनिक शौचालय,पाणी व जल व्यवस्थापन, सौर उर्जेवर आधारित विद्युतीकरण, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोशाळा, सांस्कृतिक सभागृह यासह एकूण सतरा कामे प्रस्तावित आहेत.
पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथ गडासाठी देखील 25 कोटीच्या विकास आराखड्यातून बहुउद्देशीय सभागृह, संरक्षण भिंत, लहान मुलांसाठी बगिचा व उद्यान, पाणी जल व्यवस्थापन, अंतर्गत व बाह्य सौर उर्जा यंत्रणा, गोशाळा बांधकाम, पोलीस मदत केंद्र आदीसह एकवीस कामे प्रस्तावित आहेत. या दोन्ही आराखड्यास निधी उपलब्ध झाल्यानंतर तीन ते अठरा महिन्यांचा कालावधी लागेल, असे बीडचे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथील श्री संत मुक्ताई मंदिर या ब वर्ग तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 9.08 कोटीच्या आराखडयास यावेळी मान्यता देण्यात आली.या निधीमधून अति महत्वाच्या व्यक्तीसाठी दालन व अंशत: खुले भक्त निवास, सभा मंडप व गर्भगृह, पाणी पुरवठ्याची व्यवस्था करणे, विद्युतीकरण, संगणकीकरण आदी कामे करण्यात येतील.
या बैठकीला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार एकनाथ खडसे, विनायक मेटे, मुख्य सचिव सुमित मल्लिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता उपस्थित होते.
००००
शैलजा वाघ दांदळे/डिएलओ/ 9.1.2018
वृ.वि. 84 19 पौष,1939 (दु.4.15 वा.)
‘दिलखुलास‘ कार्यक्रमात प्रा. राम शिंदे
मुंबई. दि. 9 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘दिलखुलास‘ कार्यक्रमात ओबीसी मंत्रालयाची रचना आणि कार्यपद्धती या विषयावर मृद व जलसंधारण, राजशिष्टाचार तथा विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे मंत्री प्रा. राम शिंदे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून बुधवार दि. 10 आणि गुरुवार दि. 11 जानेवारी रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक पल्लवी मुजुमदार यांनी ही मुलाखत घेतली आहे.
ओबीसी मंत्रालयाची रचना आणि कार्यपद्धती, ओ.बी.सी. मंत्रालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणा-या विकास योजना, विविध महामंडळाच्या कामकाजाचा समन्वय, ओबीसी मंत्रालयाच्या सबलीकरणाकरिता नाविन्यपूर्ण उपक्रमांची सुरुवात आदी विषयांची माहिती श्री. शिंदे यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.



