👁 9 Views

संत वामनभाऊंनी वारकरी सांप्रदायाची पताका फडकवत ठेवली – आ.जयदत्त क्षीरसागर

पंढरपूर LIVE 9 जानेवारी 2018
निलेश चाळक बीड :- खर्‍या अर्थाने संत वामनभाऊयांनी अनाथांचे नाथ बनून आयुष्यभर आपले कार्य चालू ठेवले होते. गुरू शिष्यांची पंरपरा ही देन वारकरी सांपदायाची आहे. या सांप्रदायाला वाढवून प्रगल्भ करण्याचे काम करत वारकरी सांप्रदायाची पताका त्यांनी फडकवत ठेवली असल्याचे प्रतिपादन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
गहिनीनाथ गड येथे संत वामनभाऊ यांच्या 42 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजीत कार्यक्रमात बोलताना आ.जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, संतांच्या विचारातून समाज घडवला जातो. संत महंतांच्या योगदानामुळेच गडाला महत्व प्राप्त होते. गहिनीनाथ गडाचे महत्व आणि त्याचा अलौकीक हा केवळ संत वामनभाऊंमुळे समाजापर्यंत गेला. प्रभूच्या नामस्मरणामध्ये माणसाच्या जीवनाची नौका पैलतीराला लागते ही शक्ती आणि ताकत वारकरी सांप्रदायात आहे. हा कार्यक्रम म्हणजे सांप्रदायिक कार्यक्रमाचा कळस चढवणारा आहे. साधू संतांनी दिलेल्या योगदानामुळे गडाला महत्व प्राप्त होते. संत हे कुठल्या एका धर्माचे नसतात, सर्व धर्म समभावाची शिकवण ही वारकरी सांप्रदायातून मिळते. गुरू शिष्याच्या परंपरेमुळे आजही महाराष्ट्रात वारकरी सांप्रदायाची पताका डोलाने फडकत आहे. त्यामुळेच समाजाच्या उध्दारासाठी ज्या-ज्या संतांनी कार्य केले आहे त्या संतांचा आदर्श विचार आजही समाजमनावर खर्‍या अर्थाने प्रकाश टाकणारा आहे. इतरांचे दुःख आणि वेदना जाणून घेऊन अज्ञानाला दूर करून भगवंत भक्तीच्या मार्गाला नेऊन सोडण्याचे काम खर्‍या अर्थाने संतांनी केले आहे. संतांच्या वाडमयातून आणि त्यांच्या शब्द सामर्थ्यातून समाज घडवण्याचे काम होत असते. बीड जिल्हा ही संतांची भुमी आहे त्यामुळे आपला समाज संयमी आणि धार्मिक वृत्तीचा आहे. स्वतःला घडवण्यासाठी आणि दुःख नाहीसे करण्यासाठी संत विचारातून समाज प्रबोधन करण्याचे काम अखंड हरीनाम सप्ताह, किर्तन महोत्सव आणि धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे याचा आपल्याला अभिमान वाटतो. 
धकाधकीच्या समाजव्यवस्थेत संत विचाराची प्रेरणा मिळणे हे आपण भाग्य समजायला हवे असे सांगून आ.जयदत्त क्षीरसागर यांनी संत वामनभाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त आलेल्या भाविकांसमोर आपले विचार मांडले. यावेळी *पालकमंत्री पंकजा मुंडे,* अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे, आ.भिमराव धोंडे, आ.बाळासाहेब  मुरकूटे, माजी मंत्री सुरेश धस, माजी आ.साहेबराव दरेकर, *डॉ.योगेश क्षीरसागर,* जि.प.अध्यक्षा सविता गोल्हार, रश्मी बागल, बाळासाहेब आजबे, रामनाथ बडे, वैजीनाथ तांदळे, चंद्रकांत सानप, सतीष शिंदे, सुधाकर मिसाळ, रामराव खेडकर आदि उपस्थित होते.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *