पंढरपूर LIVE 1 July 2018
मंगळवेढा तालुक्यातील 35 गावचा पाणीप्रश्न आणि निवडणुका यांचं एक अतुट नातं निर्माण झालं असल्याची भावना पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातून आमदारकीची निवडणुक लढवु इच्छिणार्या प्रत्येक पुढार्याच्या मनात निर्माण व्हावी इतपत हा 35 गावचा पाणीप्रश्न गाजलेला आढळून आलेला आहे. परंतु मंगळवेढा तालुक्यातील शेतकर्यांच्या पदरी मात्र अद्याप फक्त आश्वासनांच्या गाजराशिवाय काहीही पडलेले नाही. ही विदारक वस्तुस्थिती डावलुन चालणार नाही. मंगळवेढा तालुक्यातील तरुणाईमधून आता वेगवेगळ्या मार्गाने याबाबतची खदखद व्यक्त होताना आढळत आहे. नुकतीच मंगळवेढा तालुक्यातील लेंडवे चिंचाळे येथील संतोष माने या तरुणाने नेत्यांच्या निष्क्रीयेतेसंदर्भात आपल्या मनातील खदखद सोशल मिडीयाच्या माध्यमातून व इतर माध्यमातून व्यक्चत केली आहे. संतोष मानेंच्या या मनोगतामुळे मात्र पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात खळबळ उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. नेमकं काय म्हणणं आहे संतोष मानेचं हे जसेच्या तसे आम्ही प्रसिध्द करत आहोत.
35 गावांच्या उपसा सिंचन योजनेला मंत्रीमंडळाची प्रशासकीय मान्यता मिळणे हि गोष्ट दिलासादायक आहे.परंतु पेढे वाटून,फटाके फोडून आनंद साजरा करण्याइतकी भूषणावह नाही.आपण मागास आहोत आपल्यावर सातत्याने अन्याय झाला आपणाला पाणी मिळालं नाही हि लाजिरवाणी गोष्ट आहे. पेढे वाटणे फटाके फोडून आनंद साजरा करणे म्हणजे आपल्या मागासलेपणाचे प्रदर्शन मांडणे होय. एक गोष्ट ध्यानात असू द्या पाणी आपल्या रानात आले नाही. शासननिर्णय अजुन मंत्रालयातच आहे याचा विसर पडू देऊ नये. त्या शासन निर्णयामध्ये हि 35 गावांची योजना पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल? याचे बंधन काय दिले आहे? हे कोणालाच माहित नाही. किती टी एम सी पाणी आपल्या 35 गावांना मिळणार? हेही माहित नाही. या योजनेसाठी कोठून व कसे पाणी मिळणार? हेसुद्धा माहित नाही.हि योजना पूर्ण करण्यासाठी पैसा कुठून येणार ? तो कोण देणार ? किती टप्प्यात देणार? याची सुस्पष्टता नाही तसेच कोणाला माहिती नाही. हि 35 गावांची उपसा सिंचन योजना अंमलात कशी आणली जाणार याची कोणतीही रूपरेषा उपलब्ध नाही. या योजनेसाठी शासनस्तरावर कोणत्याही कमिटीची स्थापना अथवा प्रशासकीय नियुक्त्या केल्या नाहीत. त्या शासन निर्णयामध्ये कायदेशीर त्रुटी असू शकतात.त्या कायदेशीर त्रुटी दुरुस्त करण्यासाठी पुन्हा या निर्णयाला कोर्टात आव्हान दिले जाऊ शकते त्याचा निकाल लागण्यास पुन्हा काही वर्षे जाऊ शकतात.अशा कोणत्याही प्रकारचे भान तुम्हाला राहिले नाही. टी.व्ही.ला बातमी बघून,सोशल मीडियात व्हायरल न्यूज बघुन मी पाणी आणलं म्हणून क्रेडीट घेण्यासाठी सर्व छोट्या-मोठ्या पुढार्यांची केविलवाणी धडपड चालू आहे. हि गोष्ट खेदजनक व संतापजनक आहे.
नदीवर ब्यारेज कधी बांधणार?त्याचा काही शासननिर्णय आहे का? असेल तर अंमलबजावणी कधी करणार?का पुन्हा तो प्रश्न तापवणार आणि राजकारण करणार हे पण सांगा. टोकण निधी कोठे गेला ?याचंपण उत्तर द्या.जनतेच्या भोळेपणाचा फायदा घेणे बंद करा. शासननिर्णय सार्वजनिक करा,शासननिर्णय सोशल मिडीयावर टाका. मोकळ्या पाण्याच्या गप्पा आणि पोस्टरबाजी बंद करा आता जनता फसणार नाही.
35 गावांचा पाणीप्रश्न सोडून मतदारसंघात बाकीच्या समस्यापण आहेत याचा तुम्हांला विसर पडला आहे.मंगळवेढा एस टी आगाराची काय अवस्था झाली आहे हे तालुक्यातील सर्व जनतेला माहित आहे. कारण धडधडत-धडपडत आम्ही प्रवास करतो ना! तुम्हांला आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यास निवडून दिले आहे याचा विसर पडलेला दिसतोय. जर विसरला नसेल तर जाणून-बुजून तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहात.तुमच्या नाकर्तेपणाचे खापर पुन्हा दुसर्याच्या डोक्यावर फोडून मोकळे होण्याच्या विचारात तुम्ही दिसताय. मतदारसंघात बेरोजगार तरुणांची संख्या जास्त आहे त्या तरुणांना इथल्या इथे कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करण्यासाठी तुम्ही कोणत्याही उपाय योजना केल्या नाहीत. पंढरपुरात असो किंवा मंगळवेढ्यात असो एकही नवीन उद्योगधंदा सुरु केला नाही. अथवा उद्योगधंदा सुरु करण्यासाठी पुढाकार घेतला नाही.पाणीप्रश्न तापवणे हाच तुमचा एकमेव उद्योग.नवीन उद्योग व व्यवसाय सुरु करण्यासाठी कोणत्या संस्था अर्थसहाय्य करतात याचे साधे मार्गदर्शन करण्याची तसदीही तुम्ही घेतली नाही. मग आम्ही मागासच राहणार ना. याउलट ज्या सहकारी संस्था शेतकर्यांनी आपल्या घामाच्या पैशांनी उभ्या केल्या त्याच सहकारी संस्थावर तुम्ही सत्ता स्थापन केली पुन्हा शेतकर्यांच्याच पैश्यावर डल्ला मारण्याचे काम तुम्ही बेमालूमपणे,राजरोसपणे आणि स्वाभिमानाने सुरु केले आहे. शेतकर्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा म्हणून मंगळवेढ्याला नवीन बाजारपेठ आणण्यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न तुम्ही केले नाहीत.(हमीभाव हा बाजारपेठ उपलब्ध झाल्यानंतरचा विषय आहे) शेतकर्यांना बाहेरील एखादी चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले नाहीत आणि तसा पुढाकार घेतला नाही.तुम्ही फक्त शेतकर्यांनी शेतात पिकवलेला माल आंदोलनाच्या नावाखाली रस्त्यावर विसकटून देण्याचे व शेतकर्यांच्या जनावरांचे दुध रस्त्यावर ओतण्याचे काम प्रामाणिकपणे केले.आंदोलन करताना पुन्हा शेतकर्यांची वाहने अडवण्याचे काम तुम्ही केले.ज्या शेतकर्यांचा माल तुम्ही रस्त्यावर विस्कटला त्यांनाच वाहने अडवून त्रास दिला.जनतेच्या प्रश्नासाठी जनतेलाच त्रास देऊन जनतेचा प्रश्न कसा सुटणार?याचा खुलासा करा.
तालुक्यातील शैक्षणिक परिस्थितीचे तर तुम्हांला भानच राहिले नाही.तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुद्धा स्थलांतर करण्याची वेळ तुम्ही आणली.एम ए ,एम स्सी चं शिक्षण पण आम्हांला आमच्या तालुक्यात मिळत नाही,बी एस्सी चे शिक्षण पण आम्हांला
भरमसाठ फी भरून घ्यावे लागत आहे.बाहेरील शिक्षणसंस्थांशी तुम्ही संगनमत केले आहे काय? याचं उत्तर नाही असेल तर मग आमच्या मुलांना आमच्या तालुक्यात शिकण्याचा अधिकार का मिळत नाही? याचेही उत्तर द्या. 35 गावे सोडा मतदारसंघातील बाकीच्या गावांसाठीसुद्धा तुम्ही काहीच केले नाही. तुम्ही फक्त हाय मास्ट दिवे लावले आहेत.ज्या भागात पाणी आहे त्या भागातील जनतासुद्धा सुखी नाही.तुम्ही म्हणाल त्यांना तर पाणी उपलब्ध आहे.शेती डेवलप करण्यासाठी तेथील लोकांनी कर्जे काढली त्यामुळे त्या भागातील लोकांचा कर्जबाजारीपणा वाढला आहे. त्या भागातील लोकांचे स्थलांतर वाढले आहे.पाणी असूनही तेथील शेतकरी सुखी नाही, पण तुम्ही सुखी आहात कारण तुमचे कारखाने चालतात.जरा शेतकर्यांचा पण विचार करा.एखादी नवीन वित्तपुरवठा करणारी संस्था शेतकर्यांसाठी तुम्ही आणू शकला नाही आणि वित्तपुरवठा करणारी संस्था मतदारसंघात आणण्यासाठी पुढाकार सुद्धा घेतला नाही.
लोकांच्या आरोग्यात सुधारणा व्हाव्या म्हणून तुम्ही काय केले? काहीही केले नाही.एकही नवीन हॉस्पिटल बांधले नाही.आता सध्या उपलब्ध असलेली रुग्णालये सलाईनवर आहेत.त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही अथवा पुढाकार घेतला नाही. लक्षात ठेवा ग्रामीण रुग्णालये म्हणजे जनतेचा आधार आहे.तुम्हांला थोडे काही झाले तर तुम्ही लगेच मुंबई – पुण्याला चांगल्या सुविधा असलेल्या दवाखान्यात उपचार घेता पण गोरगरीब जनता घेऊ शकत नाही हि शोकांतिका आहे. पंढरपुर – मंगळवेढ्याच्या इतिहासात जनतेच्या हिताची काळजी करणारा एकही लोकनेता तयार झाला नाही हि आमची शोकांतिका आहे.
संतोष मानेंच्या वरील मनोगतामुळे कुणाला कांही फरक पडेल की नाही परंतु एक मात्र इथं अधोरेखीत करावंस वाटतंय की मंगळवेढा तालुक्यातील तरुणाईमध्ये नेत्यांच्या निष्क्रीयेतेविरुध्दची खदखद व्यक्त होत आहे. आणि ही खदखद आगामी विधानसभा निवडणुकीच्या काळात नक्कीच वेगळे वळण घेणारी ठरु शकते. त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील प्रलंबीत प्रश्नांबाबत नुसत्या घोषणा करण्याऐवजी हे प्रश्न प्रत्यक्षात निकाली काढण्यासाठी नेते मंडळींनी धडपड करण्याची आवश्यकता असल्याची भावना मंगळवेढेकरांमधून व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com