पंढरपूर LIVE 1 July 2018
पंढरपूर- शैक्षणिक वर्ष २०१८-१९ करीता प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाने सोलापूर जिल्ह्यात आघाडी घेतली असून सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा स्वेरीच्या ‘पंढरपूर पॅटर्न’ला सर्वाधिक पसंती दिली आहे.पहिल्या फेरीत ५६७ पैकी ४३२ जागा अलॉट झाल्या असून स्वेरीतील कॅम्पस प्लेसमेंट, गरजेची शिस्त, वार्षिक परीक्षेचा निकाल आणि विद्यार्थी व विद्यार्थीनींना मिळणारी सोय, विद्यार्थ्यांची शैक्षणिक विकास, उच्च शिक्षित प्राध्यापकांचे विद्यार्थ्यांकडे असणारे वैयक्तिक लक्ष याचाच विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा अभ्यास करून ‘स्वेरी’ला पसंती दिली आहे . जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांकडून दिलेली महाविद्यालय पसंतीची आकडेवारी पाहता असे स्पष्ट होते की विद्यार्थी व पालकांनी कोणत्याही आकर्षणाला बळी न पडता केवळ गुणवत्तेलाच प्राधान्य दिलेला आहे.
शैक्षणिक वर्ष २०१८-१९ करीता दि. २५ ते २८ जून २०१८ दरम्यान अभियांत्रिकीच्या पहिल्या फेरीची ऑनलाईन प्रक्रिया चालली, त्यातून महाविद्यालय निवडण्याच्या प्रक्रियेत जिल्ह्यातील विद्यार्थ्याबरोबरच जिल्ह्याबाहेरून देखील विद्यार्थ्यांनी स्वेरीलाच पसंती दिली आहे. सोलापूर विद्यापीठ अंतर्गत एकूण १४ महाविद्यालये आहेत. त्यातील काही महाविद्यालये बाटुकडे तर काही सोलापूर विध्यापीठ अंतर्गत कार्यरत आहेत. दोन्हीकडे बी.टेक डिग्री मिळणार असल्याने विद्यार्थ्यांनी सोलापूर विद्यापीठात कार्यरत असणाऱ्या स्वेरीलाच प्रथम पसंती दिली आहे. सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत स्वेरी अभियांत्रिकीच्या उपलब्ध असणाऱ्या एकूण जागांपैकी ७६.१९ टक्के जागा अलॉट झाल्या आहेत. अलॉटमेंटमध्ये देखील प्रथम येण्याची परंपरा स्वेरीने कायम राखली असून सलग चौथ्या वर्षीही सोलापूर व बाटु विद्यापिठात प्रवेश प्रक्रियेत बाजी मारली आहे. प्रवेश प्रक्रियेसह, वार्षिक परीक्षेच्या निकालात, प्लेसमेंट मध्येदेखील स्वेरी अभियांत्रिकी सोलापूर व बाटु विद्यापिठात आघाडीवर आहे. संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या दिशादर्शक नेतृत्वाखाली तब्बल २२ पीएचडी प्राप्त उच्च शिक्षित प्राध्यापकांच्या सानिध्यात विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असतात. त्यामुळे विद्यार्थी देखील भविष्यात स्वतःचा विकास उत्तमरित्या करू शकतो. एकूणच पहिल्या फेरीत आघाडी मारली असली तरीही आणखी दोन फेऱ्या उरल्या असून दुसरी फेरी येत्या ६ जुलै पासून सुरु होणार आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी स्वेरीकडे नियमित वर्ग देखील करत होते. प्रवेश प्रक्रियेला लागणारा वेळ यातून अभ्यासासाठी मिळणारा वेळ कमी पडतो यामुळे पहिल्या फेरीनंतर वर्ग सुरु झाल्याचा फायदा विद्यार्थ्यांना मिळाला असून विद्यार्थ्यामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्या विद्यार्थ्यांना स्वेरीत प्रवेश मिळाला नाही त्यांनी प्रवेश प्रक्रियेत नॉट फ्रिझ (फ्लोट) करण्याकडे कल दर्शविला आहे तर अनेकांनी स्वेरीच मिळावे यासाठी दुसऱ्या फेरीत प्रयत्न करणार आहेत.या बाबत स्वेरीचे सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले, ‘विद्यार्थी व पालकांनी यंदा देखील नेहमीप्रमाणे स्वेरीच्या शिक्षण पद्धतीवर विश्वास दर्शविला असून आम्ही त्या विश्वासाला पात्र राहून विद्यार्थ्याच्या जडणघडणीला प्रथम प्राधान्य देऊ.’ या अभियांत्रिकी प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. पी.एस.कचरे (९५४५५५३७७४), फॅसिलीटेशन सेंटर (क्र. ६२२०) चे प्रमुख प्रा. आर. बी. कागदे (९९७५३८२२२३) व टोल फ्री क्रमांक १८०० ३००० ४१३१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही केले आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com