👁 10 Views

पंढरपुर सिंहगडच्या ०५ विद्यार्थ्याची सीमेन्स कंपनीत निवड

पंढरपूर LIVE 15 July 2018


सीमेन्स या कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांसोबत प्राचार्य डॉ. कैलाश करांडेडॉ. राजश्री बाडगे, श्रीनिवास गंजेवार,प्रा.अल्ताफ मुलाणी, प्रा. प्रवीण कलूबर्मे, प्रा. सोमनाथ कोळी, प्रा. सुर्यकांत पाटील

पंढरपुर (प्रतिनिधी) एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी- पंढरपूर महाविद्यालयातील ०४ विद्यार्थ्यांची जगातील नामवंत असलेल्या सीमेन्स कंपनीत सिंहगड महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली
      भारतात सुमारे 90 वर्षे सीमेन्स उदयोन्मुख भारताच्या विकासाशी संबंधित आहेत. भारताच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करणे,संपूर्ण आरोग्यसेवेकरिता रुग्णांना ऊर्जानिर्मिती करणे किंवा रुग्णालये सशक्तीकरण करणेभारतासाठी एक टिकाऊ भविष्य घडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठेमध्ये सीमेन्सने जागतिक दर्जाची तंत्रज्ञानाची आणि पायाभूत सुविधांची निर्मिती केली आहे. त्याच्या उत्पादनांच्या आणि समाधानाद्वारेभारतातील सीमेन्सने लाखो भारतीय नागरिकांचे जीवन प्रभावित केले आहे. अशा या कंपनीत पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अॅड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील स्नेहल पुजारीप्रगती पाटीलराणी जाधव इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागातील संदेश दिक्षित तर मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागातील आण्णा मासाळ आदी विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली आहे. सीमेन्स नामांकित कंपनीत पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सोलापूर जिल्हातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.
    सिंहगड महाविद्यालयात कुशलअनुभवी व उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वर्ग तसेच  पी.एच.डी धारक १३ तर पी.एच.डी शिक्षण घेणारे ३० प्राध्यापक असून या प्राध्यापकच्या ज्ञानाच फायदा एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी- पंढरपूर महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होत आहे. याचा बरोबर दक्षिण आफ्रिकेतील ज्ञानदानाचा अनुभव असणारे २३ प्राध्यापक महाविद्यालयात असून विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन शिक्षण देणारे पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात आज अभियांत्रिकी शिक्षणात अग्रेसर ठरत आहे. सीमेन्स या कंपनीत प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडेट्रेनिंग अॅड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. राजश्री बाडगेडॉ. चेतन पिसेडॉ. रविंद्र व्यवहारेप्रा. सुभाष पिंगळेप्रा. श्रीनिवास गंजेवारप्रा.अल्ताफ मुलाणी, प्रा. प्रवीण कलूबर्मे, प्रा. सोमनाथ कोळी, प्रा. सुर्यकांत पाटील आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *