पंढरपूर LIVE 15 July 2018
कृषी महोत्सवात विविध प्रगतशील शेतकऱ्यांना पुरस्कार देण्याची केली सूचना
पंढरपूर – आषाढी वारीच्या निमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समिती व शुअर शॉट इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी पंढरी या कृषी महोत्सवाची तयारी अंतिम टप्यात आली असून कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळावा सभामंडप उभारणीच्या कामाची आमदार प्रशांत परिचारक यांनी पाहणी केली. वारीला येणाऱ्या जास्तीत जास्त भाविकांना या कृषी महोत्सवाचा लाभ घेता यावा यासाठी हा कृषी महोत्सव एकूण ५ दिवस चालणार असून जिरायती, बागायती पिकांबरोबरच प्रयोगशील शेतीदेखील डोळ्यसमोर ठेवून प्रदर्शनामध्ये तश्या प्रकारच्या कंपन्या सहभागी कराव्यात अशी सूचना परिचारक यांनी केली.
गेल्या ३ वर्षापासून या कृषी महोत्सवाचे आयोजन होत असून हा कृषी महोत्सव आषाढी वारीतील आकर्षण बनत चालला आहे. या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर मिळालेले नॉलेज एक प्रकारे आषाढी वारीचा प्रसाद समजून वारकरी भाविक सोबत घेवून गेला पाहिजे अशा प्रकारची महोत्सवाची तयारी करावी तसेच आगर्वूड लागवड, खजूर शेती, मधमाशी पालन, शेळीपालन, रक्तचंदन लागवड, बांबू लागवड, मोत्यांची शेती अश्या नवनवीन कमी उत्पादन खर्च व जास्त उत्पन्न अशा पिकांची माहिती देणारे उद्योजक देखील निमंत्रित करावेत अशी सूचना पदाधिकार्यांना केल्या. यावेळी आमदार परिचारक यांनी मुख्य सभामंडप, सुरक्षा व्यवस्था, पाणी व स्वच्छता व्यवस्था यांची पाहणी केली. या प्रदर्शनाच्या प्रचार प्रसिद्धीसाठी १८ व १९ जुलै रोजी होणाऱ्या रथयात्रेसाठी देखील सूचना दिल्या.
हा कृषी महोत्सव दि.२१ ते २५ जुलै दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर होत असून यावेळी कृषी प्रदर्शनाबरोबरच कृषी औजारांच्या प्रात्यक्षिकांसाठी विशेष क्षेत्र, देशी गायींचे प्रदर्शन, लघुउद्योग क्षेत्रातील उद्योगांचे विशेष दालन व महिला बचत गटांचे विशेष दालन यांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रदर्शनामध्ये ३०० पेक्षा जास्त स्टोल्स चा समावेश असून एकूण ७ एकर विस्तीर्ण क्षेत्रावर हे प्रदर्शन आयोजित केले जात आहे. यावर्षी प्रथमच देशी गायींचे प्रदर्शन देखील या प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार आहे.
शेतकऱ्यांना कृषी प्रदर्शनाकडे जास्तीत जास्त आकर्षित करण्यासाठी यावर्षी १० रुपयांच्या कुपनमधून एका भाग्यवान विजेत्याला ट्रॅक्टर जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत असून महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने यावर्षी संवाद वारी या उपक्रमांतर्गत विशेष शासकीय दालन देखील उभारले जाणार आहे. या दालनामध्ये शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजनांची माहिती वारकरी व शेतकऱ्यांना मिळणार आहे अशी माहिती सभापती दिलीप आप्पा घाडगे व उपसभापती विवेक कचरे यांनी दिली.
यावेळी सुरेशराव आगवणे, शिवानंद पाटील, युनुसभाई शेख, औदुंबर वाडदेकर, सचिव कुमार घडगेम, सहसचिव धन्यकुमार जगदाळे, शुअर शॉट इव्हेंट्सचे संदीप गिड्डे उपस्थित होते.
- आमदार प्रशांत परिचारक यांच्या सूचनेनुसार यावर्षीपासून कृषी पंढरी कृषी महोत्सवात प्रयोगशील शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यात येणार असून डाळिंब निर्यात, शेळीपालन, वैविद्यपूर्ण शेती, फायदेशीर जोडधंदा, नाविन्यपूर्ण प्रयोग केलेल्या ७ शेतकऱ्यांची निवड करून २२ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे, तरी शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव कृषी बाजार समितीमध्ये सादर करावेत असे आवाहन सभापती श्री. घाडगे यांनी केले आहे.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com