पंढरपूर LIVE 8 ऑक्टोबर 2018
पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात सोमवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी कॉम्प्युटर सायन्स अॅड इंजिनिअरींग विभागात “मशीन लर्निंग” या विषयावर चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. हे चर्चा सत्र मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
कॉम्प्युटर सायन्स अॅड इंजिनिअरींग विभागात द्वितीय व तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी “मशीन लर्निंग” या विषयावर शास्त्रज्ञ अवधुत सरदेशमुख यांचे चर्चा सत्र आयोजित केले होते यादरम्यान विषयावर शास्त्रज्ञ अवधुत सरदेशमुख यांचे यांचे स्वागत प्रा. प्रकाश गडेकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी मार्गदर्शन करताना पुणे येथील सायंटिस्ट टाटा रिचर्स व डेव्हल्पमेंट चे अवधुत सरदेशमुख म्हणाले, या चर्चा सत्रात मध्ये प्रामुख्याने मशीन लर्निंग म्हणजे काय? मशीन लर्निंग कसे होते? मशीन लर्निंग शिकून कोण-कोणते प्रकल्प करू शकतो व सध्या इंडस्ट्रीमध्ये याचा वापर कसा होतो. तंत्रज्ञान धोरणांचा अवलंब करण्यासाठी मायक्रोसॉफ्टतर्फे सल्लागार, अनुभवी आणि सक्षम अधिकारीही दिले जाणार आहेत. तसेच, महाआयटी तर्फे स्थापन करण्यात येणाऱ्या सक्षम संशोधन केंद्रांनाही कंपनी तर्फे विशेष सहाय्य पुरवले जाणार आहे. भारतातील शेतकरी, आरोग्यसेवा पुरवठादार, शिक्षणक्षेत्रातील यंत्रणा व विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी तसेच, विकसित नागरी सेवांसाठी आम्ही गेल्या काही वर्षांत क्लाऊड, मोबाइल आणि मशीन लर्निंग आधारित सोल्यूशन्स विकसित केली आहेत असे मत अवधुत सरदेशमुख यांनी व्यक्त केले.
हे चर्चा सत्र कॉम्प्युटर सायन्स अॅड इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम यशस्वी करणासाठी प्रा. सोमनाथ ठिगळे, प्रा. प्रकाश गाडेकर श संगणक विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळी:- सिंहगडच्या संगणक विभागात “मशीन लर्निंग” या विषयावरील चर्चासत्रात बोलताना सायंटिस्ट टाटा रिचर्स व डेव्हल्पमेंट चे अवधुत सरदेशमुख समोर विद्यार्थी वर्ग
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com








