👁 8 Views

संग्राम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

पंढरपूर LIVE 7 ऑक्टोबर 2018

भंडीशेगांव, ः अखिल भारतीय यलमार समाज संघटनेचे अध्यक्ष संग्राम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीराम शेतकरी बचत गटाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आज सोमवार दि. 8 ऑक्टोंबर रोजी वृक्षारोपण व खाऊ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. 



एच.आय.व्ही. बाधित अनाथ मुलांचे वसतीस्थान पालवी संस्थेमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीष आराध्ये यांचे हस्ते खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी रिपाइं युवक आघाडीचे प्रदेश संघटक दिपक चंदनशिवे, डॉ. अनिल कंडरे, डॉ.श्रीधर यलमार, अमोल पवार, सुहास गुराडे, प्रल्हाद व्होटे, संस्थेच्या अध्यक्षा मंगलताई शहा उपस्थित होत्या.
रायझिंग इंग्लिश मिडियम स्कूल, इसबावी या ठिकाणी डॉ. श्रीधर यलमार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी प्राचार्या एस. नागणे, दिपाली सरडे, जयश्री कुंभारे संजय गुरव आदी उपस्थित होते. 
भंडीशेगांव येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम पंचायत समिती सदस्या सौ. पल्लवीताई कंडरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सावता ननवरे, डॉ.श्रीधर यलमार, डॉ. अनिल कंडरे, बचत गटाचे अध्यक्ष शकील काझी, उपाध्यक्ष गणेश रत्नपारखी, सचिन यलमार आदींसह अनेकजण उपस्थित होते.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *