पंढरपूर LIVE 21 नोव्हेंबर 2018
सांगोला/प्रतिनिधी :
शहीद अशोक कामटे संघटनेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या मोफत ब्लड ऑन कॉल याला तीन वर्षे झाले. तीन वर्षात सांगोला, पंढरपूर, करमाळा, बार्शी, माळशिरस व अक्कलकोट तालुक्यातील 328 रुग्णांनी याचा फायदा घेतला. रक्तदात्यांचा प्रवास खर्चही संस्थेने केला. 100% मोफत सेवा संघटनेने बजावल्यामुळे गतवर्षी 1150 रक्तदाते होते. या वर्षापासून 1321 रक्तदाते स्वयंस्फूर्तीने तयार झाले आहेत. लाभ घेणाऱ्या रुग्ण व नातेवाईकांनी या उपक्रमाला धन्यवाद दिले आहेत.
अनेकवेळा गरजू रुग्णांना विविध गटातील रक्ताची गरज भासते. अशावेळी आवश्यक असणाऱ्या गटाचे रक्त वेळेत मिळत नाही. त्यासाठी वेळ व पैसा फुकट वाया जातो. तोपर्यंत रुग्णांचा जीव टांगणीला लागलेला असतो. या सर्व बाबींचा विचार करुन संघटनेने 26 नोव्हेंबर 2015 पासून ब्लड ऑन कॉल ही मोफत रक्त पुरवठ्याची योजना आखली. रुग्णांना फोन करताच मोफत रक्तपुरवठा येथील संस्थेच्या रक्तदात्यांनी गेली वर्षभर केला आहे.
गतवर्षी 189 पुरुष व 69 स्त्री रुग्णांनी मोफत लाभ घेतला आहे. यामध्ये मंगळवेढा, करमाळा, मोहोळ, सांगोला येथील रुग्णांचा समावेश आहे. ही योजना संपूर्ण जिल्ह्यासाठी चालू आहे. हा उपक्रम पाहून 1321 रक्तदाते आपणहून रक्त देण्यासाठी विविध गटाचे 35 रक्तदाते प्रत्येक दिवशी हजर असतात. कॉल आला की तात्काळ नियोजित ठिकाणी पोहोचतात. त्यांचा येण्याजाण्याचा खर्च शहीद अशोक कामटे संघटना करते. रुग्णांना संपूर्णपणे मोफत रक्तपुरवठा केला जातो तोही आपलेपणाने. पंढरपूरसाठी एका तासात, माढा, करमाळा साठी 3 तासात रक्तदाते नियोजित ठिकाणी पोहचत होते. गेल्या वर्षी 258 पैकी ओ पॉझिटिव्ह रक्ताला जास्त मागणी होती. काही रुग्णांना बॅंकेने संकलित केलेले रक्त चालत नाही व अशावेळी रक्तदात्याकडून सरळ रक्त घेणे मोठे खर्चीक असते. म्हणून संघटनेचे संस्थापक निलकंठ शिंदे(सर)यांनीही योजना संघटनेच्या सभासदापुढे मांडली व ती गेल्या 3 वर्षापासून चांगल्या प्रकारे चालू आहे. ज्यांना रक्त पाहिजे आहे त्या रुग्णांनी 9423327241 या क्रमांकावर 24 तास 365 दिवस संपर्क साधू शकतात. असे आवाहन अध्यक्ष संदीप बनकर यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com








