पंढरपूर LIVE 21 नोव्हेंबर 2018
पंढरपुर तालुका पोलीस ठाणे हदद्ीतील मौजे आंबे ता. पंढरपुर येथे वास्तव्यास असलेल्या एक शेतमजुर दांपत्य आपल्या लहान मुलांना घरी ठेवुन शेत मजुरीचे कामास गेले असताना त्यांचे गावातील श्रीकांत सायाप्पा पवार याने त्यांचे लहान मुलींना मोटार सायकल वरती बसवुन स्वत:चे घरी नेले. त्याचेसोबतच्या इतर लहान मुलांना खाऊसाठी पैसे देवुन खाऊ आणायला पाठवुन दिले. घराचा दरवाजा बाहेरून बंद करून अल्पवयीन मुलींेशी गैरवर्तन केले व कोणाला सांगु नका म्हणुन त्यांना खाऊसाठी पैसे दिले. ही संतापजनक घटना दि.16/11/2018 रोजी घडली होती.
अल्पवयीन मुलींनी याबाबतचा घडलेला प्रकार त्यांचे आई-वडीलांना सांगीतलेवर पिडीत अल्पवयीन मुलीचे वडीलांनी पंढरपुर तालुका पोलीस ठाणेस यातील आरोपी श्रीकांत सायाप्पा पवार याचे विरूध्द तक्रार दिलेने त्याचेविरूध्द पंढरपुर तालुका पोलीस ठाणेस भा. द. वि. सं .क . 354, 354अ, 354 ड सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8,12,42 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास पोसई/वसगडे हे करीत असुन, यातील आरोपी श्रीकांत सायाप्पा पवार यास दि.18/11/2018 रोजी अटक करण्यात आली होती. सदर आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची दि.22/11/2018 रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली असुन, सदर गुन्हयाचा तपास पोसई/प्रताप शिवाजी वसगडे हे करीत आहेत.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com








