👁 6 Views

राष्ट्रवादी युवती कॉग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी चारुशिला कुलकर्णी

पंढरपूर LIVE 3 डिसेंबर 2018


राष्ट्रवादी युवती कॉग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी पंढरपूर येथील चारुशिला कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.खा.विजयसिंह मोहीते-पाटील यांच्या हस्ते त्यांना या निवडीचे पत्र नुकतेच प्रदान करण्यात आले.राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाकार्याध्यक्ष बळीराम साठे,राजूबापू पाटील,पंढरपूर-मंगळवेढा विधानभा अध्यक्ष दिपक वाडदेकर,राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संकेत ढवळे, राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे शहराध्यक्ष संदीप मांडवे,जि.प.सदस्य अतुल खरात,किसान सभा तालुकाध्यक्ष कृष्णात माळी,राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण आसबे पाटील,अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष गुलाब मुलाणी,राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या अनिता पवार,शहराध्यक्षा रंजना हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडीचे हे पत्र प्रदान करण्यात आले. 
      

     यावेळी बोलताना खा.विजयसिंह मोहीते-पाटीलम्हणाले की,चारुशिला कुलकर्णी यांनी यापुर्वी युवती कॉग्रेसच्या शहराध्यक्षा म्हणून अतिशय समर्थपणे जबाबदारी पार पाडली असून त्याच बरोबर विविध उपक्रम राबवून त्यांनी या पदाच्या माध्यमातून जनजागृतीचा प्रयत्न केला आहे.त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्याकडे आता जिल्हा उपाध्यक्षपदाची जाबादारी सोपविण्यात येत आहे.

       
यावेळी बोलताना नुतन जिल्हाउपाध्यक्षा चारुशिला कुलकर्णी म्हणाल्या की,राज्याच्या नेत्या खा.सुप्रियाताई सुळे यांच्या विचारांचा वसा घेवून युवती कॉग्रेस राज्यभरात अनेक समाजोपयोगी व महिला जनजागृतीपर उपक्रम राबवीत आहे.आज पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्‍वास टाकून या पदाची जबाबदारी माझ्यावर सोपविली.ही जबाबदारी समर्थपणे पार पाडण्यासाठी मी जिल्हा कार्याध्यक्ष राजू बापू पाटील यांच्यासह सर्वच नेत्यांच्या मार्गदशनाखाली परिश्रम घेईल.
         
यावेळी अनिल सप्ताळ,मनोज आदलींगे,प्रशांत घोडके,विजय काळे,श्रीकांत शिंदे,सुरज पेंडाल,संगीता पाटील,मधुमती माळी,सुवर्णा चव्हाण,गिता सोळंखी,राधा मलपे यांच्यासह राष्ट्रवादी कॉग्रेसचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.    

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *