👁 7 Views

पंढरीतील सेंट्रल बँकेच्या इमारतीला आग… इमारतीच्या तळमजल्यावर चे टेलरींग दुकान जळून खाक

पंढरपूर LIVE 4 डिसेंबर 2018


पंढरपूर येथील हाँँटेल शामियाना शेजारील सेंट्रल बँकेच्या इमारतीला आज रात्री सव्वा अकरा ते साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. 
सेंट्रल बँकेच्या इमारती मधील शाँपींग सेंटरच्या तळमजल्यावरील एका टेलरींग च्या दुकानात आगीचा भडका उडाला होता. स्थानिक नागरिकांनी तातडीने यासंदर्भातील माहिती शहर पोलीस ठाण्यात कळवली. यानंतर लगेच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पंढरपूर नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला ही घटना समजताच अग्निशामक वाहन लगेचच याठिकाणी दाखल झाले. अग्निशमक कर्मचाऱ्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करून ही आग तातडीने विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
सेंट्रल बँकेला या आगीमुळे कोणताही धोका पोहचला नाही. कोणतीही इतर हानी झाली नाही. परंतु एका टेलरिंग दुकानातील संपूर्ण कपडे आगीत जळून खाक झाल्याचे समजते.
पंढरपूर शहर पोलीस घटनास्थळी जाऊन अधिक माहिती घेत आहेत.
ही आग शाँर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

    


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *