👁 10 Views

सोलापुरात भरचौकात दिवसाढवळ्या पत्रकारावर प्राणघातक हल्ला…पत्रकार संरक्षण कायदा लागु करावा… हल्लेखोरांवर कडक कारवाईची पत्रकार संघटनांची मागणी

पंढरपूर LIVE ८ डिसेंबर २०१८


लाईव्ह सोलापूर चे पत्रकार विजयकुमार बाबर व त्यांच्या सहकाऱ्यांवर सोलापूर येथील विजापूर वेस परिसरात झुंडीने आलेल्या गुंडांनी प्राणघातक हल्ला केला आहे. ही घटना आज शनिवार दि. ८ डिसेंबर रोजी दुपारी घडली आहे.

कायद्याने बंदी असतानाही कत्तलखाना चालवणाऱ्यांच्या विरोधात बातमी लावल्याने हा जीवघेणा हल्ला झाल्याचे समजते.  बाबर यांनी गाईंच्या कत्तलीसंदर्भात वृत्तमालिका सुरू केली होती. या वृत्तामुळे अनेक ठिकाणी छापा मारून पोलिसांनी कत्तलीसाठी आणलेल्या अनेक प्राण्यांची सुटका करून कठोर कारवाई सुरू केली होती.

याचाच राग मनात धरून २५ ते ३० गुंडांनी भर चौकात पत्रकार विजय बाबर यांच्यावर झुंडीने जाऊन हल्ला केला असल्याचे समजते. बाबर हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पत्रकार संरक्षण कायदा लागु करावा… हल्लेखोरांवर कडक कारवाई ची मागणी
अनेक दिवसांपासून मागणी करूनही शासनाकडून पत्रकार संरक्षण कायदा लागु केला जात नाही. त्यामुळे पत्रकारांना अशा पध्दतीने जीव धोक्यात घालून काम करावं लागतय. विविध ठिकाणी वारंवार झालेल्या पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटना पाहता पत्रकारांना निर्भीडपणे काम करणं जीवघेणं ठरतं आहे. शासनाने याचा गांभीर्याने विचार करून पत्रकार संरक्षण कायदा तातडीने लागु करावा व बाबर यांच्यावर भ्याड हल्ला करणा-या हल्लेखोरांना अटक करून कडक शासन करावे. अशी मागणी विविध पत्रकार संघटनांकडून होत आहे.

    


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *