👁 7 Views

तारापूर गाव ते फुलचिंचोली रस्त्याचा प्रश्न लागणार मार्गी

पंढरपूर LIVE ८ डिसेंबर २०१८

रस्त्याच्या कामास मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून प्रशासकीय मान्यता
पंढरपूर । प्रतिनिधी,
पंढरपूर तालुक्यातील तारापूर गाव रस्ता ते फुलचिंचोलीपर्यंत रस्ता गेल्या 25 वर्षांपासून प्रलंबित होता. या परिसरातून ये- जा करणाऱ्या ग्रामस्थांना, शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. पावसाळ्याच्या दिवसात अक्षरश: दलदल होत असल्याने या ठिकाणहून ये-जा करणे ही मुश्कील बनले होते. याबाबत मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश कदम यांच्या शिफारसीनुसार  मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सदरच्या प्रलंबित रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. सदरच्या कामाला दि.4 डिसेंबर 2018 रोजी सन 2018-19 या वित्तीय वर्षात बॅच 3 अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदरच्या रस्त्याच्या कामासाठी मी गेल्या दीड वर्षांपासून आमदार कदम यांच्या शिफारसीपत्रानुसार प्रयत्न करीत होतो अशी माहिती वस्ताद नामदेव काळे यांनी दिली.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांनी नुकतेच सदरच्या रस्त्याच्या कामाचे मार्कींग केलेले असून लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरूवात होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सदरचा रस्ता खराब झालेला होता. या रस्त्यावर ये-जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत अनेक आमदार व खासदार यांच्याकडे बऱ्याचवेळी आम्ही मागणी केली होती मात्र त्या रस्त्याची कोणतीही दखल घेतली नव्हती. परंतू मोहोळचे आमदार रमेश कदम यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्यांनी शिफारसपत्र दिल्यामुळे खऱ्या अर्थाने सदरच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे त्यांनी सांगितले. 

    


टी.आर.3 ते तारापूर- फुलचिंचोली या 3.75 किलोमीटर लांबीचा डांबरीकरण रस्ता करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी 2 कोटी 85 लाख 84 हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. सदरच्या कामाची 5 वर्षे नियमित देखभाल व दुरूस्तीसाठी 17.88 अंदाजीत रक्कम ठेवण्यात आलेली आहे. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या कामास सुरूवात होणार आहे. रस्त्याच्या कामामुळे  टाकळी सिकंदरकडे जाणाऱ्या मौजे खरसोळी, तारापूर, फुलचिंचोली व इतर गावातील ग्रामस्थांना याचा फायदा होणार आहे. सदरचा प्रश्न आमदार रमेश कदम यांच्या माध्यमातून वस्ताद नामदेव काळे यांनी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल ग्रामस्थांतून त्यांचे कौतुक केले जात आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *