👁 7 Views

पंढरपूर तालुक्यातील रांझणी येथील श्री शंभू महादेव देवस्थानच्या रू.2 कोटीच्या विकास कामाचे उद्घाटन.

पंढरपूर LIVE 13 डिसेंबर 2018

विकासकामे केल्यास जनता साथ देते– आमदार भारत भालके
पंढरपूर दि.10 ः विकास कामे केल्यास जनता साथ देते, त्यामुळे मला जनतेने आमदार केले असल्याचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांनी पंढरपूर तालुक्यातील रांझणी येथील श्री शंभु महादेव देवस्थानला ग्रामीण तिर्थक्षेत्र विकास योजनेच्या वर्ग ब अंतर्गत रू.2 कोटीच्या विकास कामाचे उद्घाटन व भुमिपूजनच्या वेळी सांगितले.
                 पंढरपूर तालुक्यातील रांझणी येथे ग्रामीण तिर्थक्षेत्र विकास योजनेच्या वर्ग ब अंतर्गत श्री शंभू महादेव देवस्थानास भाविक भक्तांसाठी भक्तनिवास, सार्वजनिक शौचालय, पाणी पुरवठा टाकी, हायमॉस्ट दिवे, पथदिवे आदी कामांचे भुमिपूजन करण्यात आले. तर देवस्थान समोरील वाहनतळाचे पूर्ण कामाचा लोकार्पण सोहळा आमदार श्री भारत भालके यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रांझणीचे मा.सरपंच श्री दामोदर दांडगे हे होते.
                 

    


सदर कार्यक्रमावेळी आमदार श्री भालके म्हणाले की, गेल्या 40 वर्षापासून वंचित असलेली विकास कामे पूर्ण करण्यासाठी ग्रामीण तिर्थक्षेत्र विकास योजना वर्ग ब अंतर्गत विविध कामांसाठी रू.2 कोटींचा निधी मंजूर केलेला असून भाविक भक्तांची यामुळे सोय होणार आहे. दुष्काळी भागातील शेतकर्‍यांच्या बागायत क्षेत्रामधील पिके वाचावी यासाठी नीरा भाटघरच्या पाण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने शासकीय स्तरावर प्रयत्न केल्यामुळे सुमारे 250 एकर क्षेत्र भिजलेले आहे. शेतकर्‍यांनी पाणी मागणीचे फॉर्म भरावे. जनतेच्या आशिर्वादामुळे माझ्या आमदारकीच्या माध्यमातून शासनस्तरावर बरीच कामे करून घेतलेली आहे. अधिकार्‍यांनी देवस्थानची कामे चांगल्या प्रकारे करावीत अशा सूचनाही आमदार श्री भालके यांनी केल्या. कोणताही निधी परत जाऊ नये याची दक्षता गट विकास अधिकारी यांनी घ्यावी. यासह अनेक सूचना आमदार श्री भालके यांनी केल्या.
                  
 
यावेळी रांझणीचे विद्यमान सरपंच श्री ज्ञानेश्वर घोडके, श्री विठ्ठल कारखान्याचे संचालक संतोष गायकवाड, सर्वश्री शहाजी नागणे, अनिल वाघमोडे, भिवाजी दांडगे, बबन पाटील, शाळा समितीचे मा.अध्यक्ष दादा ढोले, बाळासोा गांडुळे, बिभिषण अनपट, महादेव दांडगे, सुखदेव शिंदे, सुभाष दांडगे, सुरेश घायाळ, संभाजी कांबळे, श्रीमंत घाडगे, गणेश घाडगे, सचिन फरकंडे, कैलास घायाळ, सुरेश शिंदे, अतुल मोरे आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ व गट विकास अधिकारी रविकिरण घोडके, जि.प.बांधकाम विभागाचे उप अभियंता श्री वायदंडे, शाखा अभियंता श्री कांबळे व श्री पवार, ग्रामसेविका श्रीमती एस.पी.सरवदे, हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री महादेव अनपट गुरूजी यांनी तर सुत्रसंचालन श्री गणेश गायकवाड यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री शंभू महादेव देवस्थानचे अध्यक्ष श्री दत्तात्रय दांडगे यांनी केले.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *