पंढरपूर LIVE 14 डिसेंबर 2018
तंत्रज्ञानातील कार्यकुशलता व गुणवत्ता विकासासाठी आवश्यक – कुलगुरू डॉ. मृणालीनी फडणवीस
पंढरपूर– ‘समाजोपयोगी आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषदेचे आयोजन स्वेरीने उत्तमरीत्या केल्यामुळे
स्वेरी अभिनंदनास पात्र असून स्वेरीने उचललेले हे पाऊल नक्कीच नवसंशोधकांना प्रेरणा
देणारे व राष्ट्रविकासाच्या कार्यात हातभार लावणारे आहे. तंत्रज्ञानातून आश्चर्य कारक
गोष्टींची निर्मिती होते. तंत्रज्ञानातून निर्मिती करण्यात आलेल्या विविध सोयीसुविधांच्या
आधारे आजचा मानव आपली प्रगती साध्य करत आहे. टेक उद्योजक, टेक स्टार्टअप,
टेक्नोलॉजी ट्रान्स्फर तसेच तंत्रज्ञानातील कार्यकुशलता व गुणवत्ता या गोष्टी देशाच्या
विकासासाठी अत्यंत आवश्यक आहेत.’असे प्रतिपादन सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.
मृणालीनी फडणवीस यांनी केले.
स्वेरीमध्ये ‘टेक्नोसोसायटल– २०१८’ या आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषदेच्या उदघाटन
समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालीनी
फडणवीस मार्गदर्शन करत होत्या. तंत्रपरिषदेचे उदघाटन भारताच्या पहिल्या लाईट
कॉम्बॅट एअरक्राप्ट (लढाऊ विमान) चे मुख्य डिझाईनर पद्मश्री डॉ. कोटा हरीनारायण
यांच्या हस्ते झाले. प्रारंभी जोगदंड महाराज संस्कार वर्गातील विद्यार्थ्यांनी ‘सुंदर ते ध्यान
उभे विटेवरी …’ हा अभंग गाऊन परदेशी संशोधक व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
दिपप्रज्वलनानंतर तंत्रपरिषदेचे समन्वयक डॉ. प्रशांत पवार यांनी प्रास्तविकात
तंत्रपरिषदेचा मुख्य उद्धेश, देश विदेशातून आलेले सहभागी संशोधक व शास्त्रज्ञ, प्राप्त
झालेले शोधनिबंध आदी बाबत माहिती दिली. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी उपस्थितांचे स्वागत करून स्वेरीच्या
वाटचालीबाबत संपूर्ण माहिती दिली. तंत्रपरिषदेचे उदघाटक पद्मश्री डॉ. कोटा
हरीनारायण म्हणाले की, ‘शेती हा भारतीय अर्थ व्यवस्थेचा कणा असून भारतीय शेतीमध्ये
विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणे आवश्यक आहे. भारतातील भूजल पातली
वरचेवर कमी होत आहे. तेव्हा उपलब्ध पाणी साठ्याचा जपून वापर करणे आवश्यक आहे.
शेतातील विविध कामे ड्रोनच्या माध्यमातून परिणामकारकपणे केली जावू शकतात. इमेज
प्रोसेसिंग,आर्टीफिशियल इंटेलिजन्स अशा अनेक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कृषीक्षेत्रात
करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.’ यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या
परिषदेच्या ‘सोवेनियर’चे प्रकाशन करण्यात आले. तंत्रपरिषदेच्या निमित्ताने संपूर्ण कॅम्पस
आकर्षक पद्धतीने सजविला होता. स्वेरीतील स्वागताने आलेले परदेशी पाहुणे भारावून गेले.
यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून अमेरिकेतील टेक्सास ए. अँण्ड एम. विद्यापीठाचे टिस
सेंटरचे डायरेक्टर डॉ. सतीश बुक्कापटणम म्हणाले की, ‘आधुनिक उद्योगांच्या उत्पादन
वाढीसाठी स्मार्ट मॅन्यूफॅक्चरिंग, ४.० ची आवश्यकता आहे. या पद्धती अंतर्गत आय.ओ.टी.
तंत्रज्ञान व अॅटोमॅटिक प्रोडक्शन सिस्टीम हे तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे.’ यावेळी
बल्गेरियातील सोफिया विद्यापीठाचे डॉ. झ्लात्का व्हाजारनिस व डॉ. मारिया नेनोवा,
इस्त्राईलमधील मुक्त विद्यापीठाचे डॅना हरारी, अमेरिकेतील साऊथ डीकोटा विद्यापीठाचे
डॉ. संतोष के.सी., पिठाडीया फौंडेशनचे चेअरमन दिलीप पिठाडीया, जर्मनीचे भारतातील
इंडो-जर्मन कन्सल्टंट अरमीन हक, बेंगलोरमधील आय.आय. एस. सी. चे डॉ. के. राजन्ना व
प्रा. जे.एम. चंदरकिशन, बी.ए.आर.सी.चे हेमंत सोड्डे, डॉ. गुलशन रेलहान, डॉ. रमेश
जकाती, डॉ. आर. बालसुब्रमण्यम व रमांकात रात, महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी
तंत्रज्ञान आयोगाचे डॉ. अजित पाटणकर व डॉ. व्ही.व्ही. महाजनी, डिफेन्स इन्स्टिट्युट ऑफ
टेक्नोलॉजी, पुणे येथील डॉ. दिनेश सिंग ठाकूर, इंडस्ट्रीयल एक्स्पर्ट बी.एच. श्रीकांत, डॉ.
सुळे, भारती विद्यापीठाचे डॉ. प्रदीप जाधव, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा, जेष्ठ
विश्वस्त दादासाहेब रोंगे, विश्वस्त बी.डी. रोंगे, माजी अध्यक्ष व विश्वस्त व्ही.एस. शेलार,
स्वेरी अंतर्गत असलेल्या सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता,विभागप्रमुख व
प्राध्यापकवर्ग उपस्थित होते. या समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. एम.एम. भोरे यांनी केले. या
दोन दिवसीय तंत्रपरिषदेचा समारोप आज होणार आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com