पंढरपूर LIVE 19 डिसेंबर 2018
- चुकीची वीजबीले, स्थीर आकार व वीज शुल्कात वाढ
- 7 वर्षापासून शहरातील अंडरग्राऊंड केबलचे काम रखडले
स्थिर आकार,चेक बाऊंस दंड आणि इतर शुल्कात वाढ केल्याने ग्राहकांना प्रचंड अर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असले बाबत तसेच पंढरपूर शहरात गेल्या सात वर्षापासून रखडलेल्या भुमीगत वीज वाहक केबल टाकण्याच्या अपुर्ण कामामुळे विज वितरण कंपनीची फसवणूक झाल्याबाबत व या चुकीच्या पध्दतीने करण्यात आलेल्या कामाबाबात संबधीत ठेकेदाराला पाठीशी घालणार्या अधिकार्यांवर व कर्मचार्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी सोलापूर जिल्हा कॉग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने पंढरीतील महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
या धरणे आंदोलनात कॉग्रेेसचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.आ.भारत भालके यांनी या आंदोलनाच्या ठिकाणी भेट देवून कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या.या वेळी नंदकुमार सोनंदकर यांना निवेदन देण्यात आले असून दोषी ठेकेदारावर व कर्मचार्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.या धरणे आंदोलनाच्या ठिकाणी भेट देत आ.भारत भालके यांनी आंदोलकांच्या भावना जाणून घेतल्या व या बाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचना महावितरणच्या अधिकार्यांना दिल्या.
या धरणे आंदोलनास राष्ट्रवादी कॉगेे्रस पंढरपूर,मनसे,मनसे विद्यार्थी सेना,छावा संघटना,आद्यकवी महर्षी वाल्मिकी संघ,संभाजी ब्रिगेड,छावा क्रांतीवीर सेना,अ.भा.युवक मराठा महासंघ,शिवबुध्द युवा प्रतिष्ठाण,धनगर समाज पंढरपूर अदिवासी पारधी महासंघ यांनी पाठींबा दिला.या धरणे आंदोलनात जिल्हा कॉग्रेेस सरचिटणीस अमर सुर्यवंशी,सेवादलाचे जिल्हाध्यक्ष नागेश फाटे,युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितिन नागणे,ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन मल्लाव,शहराध्यक्ष ऍड.राज भादुले,वीर शेख,शहराध्यक्षा आशा बागल,नागनाथ अधटराव,गणेश माने,दिपक येळे,राजू उराडे,बाळासाहेब आसबे,संजय बागल,देवानंद इरकल,सोमेश्वर अभंगराव आदी सहभागी झाले होते.
या बाबत अधिक माहीती देताना कॉग्रेस ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष समीर कोळी म्हणाले की, महावितरण कंपनी जनतेच्या खिशाला ’फटाके’ लावत आहे. वेगवेगळ्या आकाराच्या माध्यमातून बेमालूमपणे वीज दरवाढ करण्यात आली आहे. गतवर्षी मार्च महिन्यात 55 रुपयांवर असलेला स्थिर आकार आता तब्बल 80 रुपयांवर पोहोचला आहे. प्रत्येक बिलामागे वहन आकार, स्थिर आकार असे वेगवेगळे आकार आता वीज ग्राहकांना डोईजड होत आहेत. या छुप्या वीज दरवाढीने तब्बल 40 टक्क्यांवर वाढ पोहोचल्याने सामान्य गरीब कुुटुंबातील व मर्यादीत विज वापर असणार्या ग्राहकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. महावितरणकडून राज्यात 0-100 वापराला प्रत्येक युनिटला 3 रुपये तर यापुढे 101 ते 300 युनिटपर्यंत 6 रुपये 73 पैसे तर 301 ते 500 युनिटपर्यंत 9 रुपये 75 पैसे असे दर लादण्यात येत आहेत.तर दुसरीकडे दिल्ली शहरात 0 ते 200 युनिट वीज वापरासाठी केवळ 2 रुपये युनिट तसेच 200 युनिटवर 2 रुपये 97 पैसे जनतेला दिलासा देणारा दिल्ली सरकारचा 400 युनिटपर्यंत जे काही बिल येते, त्यात 50 टक्के बिल माफ, म्हणजेच महाराष्ट्रात 400 युनिट बिलासाठी आपल्याला तब्बल 2 हजार 900 मोजावे लागतात.तर दिल्लीवाले भरतात केवळ 1 हजार 100 रुपये. दिल्लीतील ग्राहकांच्या तिप्पट रक्कम महावितरण जनतेच्या खिशातून उकळत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.एकुणच महावितरणचे धोरण हे ग्राहकांची लूट करण्याचे असून पर्यायी व्यवस्था नसल्याचा गैरफायदा उचलत महावितरण एक प्रकारे ग्राहकांना लुटण्याचेच काम करीत आहे.
पंढरपूर शहरात भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील विज वाहक तारांऐवजी भुमीगत केबलद्वारे विज वितरण करण्याच्या हेतूने सुमारे 40 कोटी रुपये खर्चाच्या भुमीगत केबल टाकण्याच्या कामास सात वर्षापुवीॅ सुरुवात करण्यात आली.मात्र आजतागायत हे काम अर्धवट अवस्थेत असून रखडलेले आहे.या कामाच्या प्रगतीचा अहवाल व ठेकेदारास अदा करण्यात आलेल्या रकमा सार्वजनिक प्रसिध्द करण्यात याव्यात व या ठेकेदारास वेळोवेळी पाठीशी घालणार्या संबधीत अधिकार्यांना व कर्मचार्यांना जबाबदार धरुन कारवाई करण्यात यावी व संबधीत ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी, पंढरपूर शहरातील विज देयके वेळेवर मिळत नाहीत तसेच मिटर रिडिंग घेणारे कर्मचारी निश्चित तारखेच रिडींगसाठी येत नसल्यामुळे ग्राहकांना जादा रिडींगमुळे स्लॅबमध्ये वाढ झाल्याने अर्थिक फटका बसत आहे.तरी या दोन्ही सेवा पुरवठा दारावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आम्ही हे धरणे आंदोलन केले असून या बाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास कॉग्रेस ओबीसी विभागाचे कार्यकर्ते महावितरणच्या दारात आमरण उपोषण करतील.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
- चुकीची वीजबीले, स्थीर आकार व वीज शुल्कात वाढ
- 7 वर्षापासून शहरातील अंडरग्राऊंड केबलचे काम रखडले
या धरणे आंदोलनात कॉग्रेेसचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.आ.भारत भालके यांनी या आंदोलनाच्या ठिकाणी भेट देवून कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या.या वेळी नंदकुमार सोनंदकर यांना निवेदन देण्यात आले असून दोषी ठेकेदारावर व कर्मचार्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.या धरणे आंदोलनाच्या ठिकाणी भेट देत आ.भारत भालके यांनी आंदोलकांच्या भावना जाणून घेतल्या व या बाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचना महावितरणच्या अधिकार्यांना दिल्या.
पंढरपूर शहरात भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील विज वाहक तारांऐवजी भुमीगत केबलद्वारे विज वितरण करण्याच्या हेतूने सुमारे 40 कोटी रुपये खर्चाच्या भुमीगत केबल टाकण्याच्या कामास सात वर्षापुवीॅ सुरुवात करण्यात आली.मात्र आजतागायत हे काम अर्धवट अवस्थेत असून रखडलेले आहे.या कामाच्या प्रगतीचा अहवाल व ठेकेदारास अदा करण्यात आलेल्या रकमा सार्वजनिक प्रसिध्द करण्यात याव्यात व या ठेकेदारास वेळोवेळी पाठीशी घालणार्या संबधीत अधिकार्यांना व कर्मचार्यांना जबाबदार धरुन कारवाई करण्यात यावी व संबधीत ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी, पंढरपूर शहरातील विज देयके वेळेवर मिळत नाहीत तसेच मिटर रिडिंग घेणारे कर्मचारी निश्चित तारखेच रिडींगसाठी येत नसल्यामुळे ग्राहकांना जादा रिडींगमुळे स्लॅबमध्ये वाढ झाल्याने अर्थिक फटका बसत आहे.तरी या दोन्ही सेवा पुरवठा दारावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आम्ही हे धरणे आंदोलन केले असून या बाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास कॉग्रेस ओबीसी विभागाचे कार्यकर्ते महावितरणच्या दारात आमरण उपोषण करतील.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com