👁 9 Views

20 डिसेंबर ला पंढरपूर येथे होलार समाजाचा भव्य मेळावा

पंढरपूर LIVE 20 डिसेंबर 2018


वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर करणार मार्गदर्शन

महाराष्ट्रात मोठया संख्येने असलेला होलार समाज स्वातंत्र्या पासून सत्तेपासून वंचित राहिला आहे आजपर्यंत होलार समाजाचा फक्त मतदानापुरता वापर करून घेतला आहे. मात्र कोणत्याच राजकीय पक्षांनी या समाजाला सत्तेत सहभागी करून घेतले नाही. तसेच हा समाज विकासापासुनही वंचित राहिला आहे. सर्व समाज एकत्र करून येत्या निवडणुकात समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी 20 डिसेंबर 2018 रोजी पंढरपूर येथे आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शांना खाली होलार समाजाचा भव्य मेळावा आयोजित केला असल्याची माहिती या मेळाव्याचे संयोजक एस के ऐवळे, बबन जावीर व नाथन केंगार यांनी दिली. 


या मेळाव्यास माजी आमदार विजय मोरे,हरिदास भदे, भटके विमुक्त समाजाचे नेते अरुण जाधव, अ‍ॅड. रावसाहेब मोहन,  आदी उपस्थित राहणार आहेत. त्यांनी पुढे सांगितले कि, येत्या नवीन वर्षात देशभर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. आमदार खासदार होण्यासाठी अनेक मात्तबर तयारी करत आहेत. सर्व जाती समूह सत्ता संपादनासाठी खडबडून जागे झाले आहेत. मात्र सर्वच पक्षांनी  गेली सत्तर वर्ष लहान लहान जातीचा फक्त मतदाना पुरता वापर करून घेतला आहे. मात्र आता या लहान लहान जातींचे समूह आता जागृत झाले आहेत. 

धनगर गरीब मराठा, दलित, भटके विमुक्त, मुस्लीम  व अनेक समूह बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. होलार समाजही एकत्र येऊन बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहून समाजाचा आमदार व खासदार निवडून आणणार आहेत.सत्तेपासून वंचित असलेल्या होलार समाजास फक्त बाळसाहेब आंबेडकर सत्तेपर्यंत घेऊन जाऊ शकतात. होलार समाजाची ताकद दाखवण्यासाठी सर्व होलार समाज बांधवांनी या मेळाव्यास मोठया संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या मेळाव्यास महाराष्ट्रातील विविध भागातून वंचित बहुजन आघाडीचे नेते व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी होलार समाजाचे कार्यकर्ते परिश्रम घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
    

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *