👁 7 Views

पंढरपूर येथे पशुसंवर्धन शिबीर संपन्न

पंढरपूर LIVE 27 डिसेंबर 2018

पंढरपूर दि. 27 :- जिल्हा परिषद सेस योजनेतंर्गत  तालुकास्तरीय पशुसंवर्धन विषयक शिबीर पंचायत समिती, शेतकी सभागृह पंढरपूर येथे संपन्न   झाले.
या शिबीरास आमदार प्रशांत परिचारक, पंचायत समितीचे सभापती राजेंद्र पाटील,  जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी सी.बी. दैवज्ञ, सहा.गट विकास अधिकारी श्री.मोरे, पशसंवर्धनचे सहा. आयुक्त डॉ.बोर्डे,  पशुधन विकास अधिकारी डॉ. निंबाळकर उपस्थित होते.
यावेळी शिबीरात जिल्हा पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. देवज्ञ यांनी पशुसंवर्धन विभागाच्या योजनाबाबत मार्गदर्शन केले. तसेच टंचाई परिस्थितीत चारा उत्पादन व नियोजन, मुरघास निर्मिती, मुक्त संचार गोठा, अझोला उत्पादन, हाड्रोफोनिक्स तंत्रज्ञान, गोचिड व जंत निर्मुलन, जनावरांचे टॅगिंग बाबतचे महत्व या बाबत पशुधन पर्यवेक्षक डॉ.शैलेश मदने यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पंचायत समितीचे सभापती राजेंद्र पाटील यांनी  पशुपालकांच्या अडचणी सोडविण्याबाबत शासकीय व खाजगी पशुवैद्यकांना आवश्यक सुचना दिल्या. 
यावेळी  आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते तालुक्यातील खाजगी पशुवैद्यकांना कृत्रिम रेतन करण्याबाबतचे ओळखपत्रे  देण्यात आली. शिबीरास  पंचायत समिती सदस्य,सहा.पशुधन अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक तसेच पशुपालक उपस्थित होते.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *