👁 8 Views

तंत्रज्ञान आणि समाज यांना जोडण्याचे मौलिक कार्य स्वेरी करत आहे

पंढरपूर LIVE 27 डिसेंबर 2018

 टेक्नोसोसायटल– २०१८या तंत्रपरिषदेच्या समारोपप्रसंगी देशी व परदेशी शास्त्रज्ञानाचा एकच सूर
पंढरपूर- स्वेरीमध्ये गेली दोन दिवस चाललेल्याटेक्नोसोसायटल– २०१८’ या आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषदेच्या समारोप प्रसंगीटेक्नोसोसायटल– २०१८’ या आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषदेमुळे नवनिर्मितीसाठी चालना मिळेल. असा सूर उमटला असून अनेक देशी व परदेशी शास्त्रज्ञांना आनंद झाला व स्वेरीने आयोजित केलेल्या या तंत्र परिषदेचे कौतुक केले. यावेळी देशी व परदेशी संशोधकांमध्ये पॅनल डिस्कशन करण्यात आले व त्याचे समन्वयन बी.ए.आर.सी.चे डॉ. आर. बालसुब्रमण्यम यांनी केले.

यामध्ये बी.ए.आर.सी.चे डॉ. आर. बालसुब्रमण्यम म्हणाले की,’ तंत्रज्ञान समाजापर्यंत कसे पोहचवायचेसंशोधकांना पुढील संशोधनासाठी दिशा देणे तसेच स्वेरीने पुढील काळात तंत्रज्ञानाच्या दृष्टीकोनातून कोणती पाऊले उचलावीत यासाठी सहभागी संशोधकांकडून पुढील काळात काय काय करावे लागेलस्वेरीने भविष्यात शेतीसाठी ड्रोन्सची निर्मिती करावी तसेच स्वेरीने आय.ओ.टी.वर आधारित,स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंगवर आधारित आणखी संशोधन करून तंत्रज्ञानाशी संबंधित व्यक्तींनी स्थानिक समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा. या परिषदेतील सहभागी संशोधकांनी आपसात संपर्क वाढवून चर्चा केली तर त्यातून संशोधनाच्या विकासास चालना मिळेल.’ या सर्व मुद्यांची चर्चा करून हाच प्रमुख उद्धेश पॅनल डिस्कशनचा आहे.’ असे सांगून स्वेरीने आगामी काळात कमीत कमी दोन ते तीन प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करावे.’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी तंत्रज्ञान आयोगाचे डॉ. अजित पाटणकर म्हणाले की, ‘संपूर्ण जग हा एकच समाज आहे समाजातील गरीब वर्गाचा तंत्रज्ञानातून विकास व्हावा. भारतातील खरी बुद्धिमत्ता ग्रामीण भागातील तरुणांमध्ये आहे. तंत्रज्ञान विकास ही सर्व जनतेची चळवळ बनवी. येत्या काळात सिलेज’ ची संकल्पना भारतच्या विकासात नक्कीच हातभार लावेल.’ बल्गेरियातील सोफिया विद्यापीठाचे डॉ. मारिया नेनोवा यांनी आपल्या मनोगतातया आंतरराष्ट्रीय परिषेदेत सहभागी होणे हा आनंददायक अनुभव असून ही परिषद विद्यार्थी व संशोधकांसाठी नक्कीच फायदेशीर व प्रेरणादायी आहे. 

एकूणच समाज आणि तंत्रज्ञानयांच्यामध्ये दुवा साधण्याचे काम या तंत्र परिषदेच्या माध्यमातून झाले आहे.असे सांगितले. भारती विद्यापीठाचे डॉ. प्रदीप जाधव म्हणाले की, ‘ज्ञानाने समाज विकासास चालना मिळावी,प्रोडोक्ट्स डेव्हलपमेन्टसाठी संशोधकांनी अधिकाधिक प्रस्ताव पाठवावेत जेणेकरून संशोधनासाठी निधी उपलब्ध होऊ शकेल.’ पुणे येथील डॉ. दिनेश ठाकूर म्हणाले की, ‘तंत्रज्ञान आणि समाज’ यांना जोडण्याचे मौलिक कार्य स्वेरी करत आहे.’ जर्मनीचे भारतातील इंडो-जर्मन कन्सल्टंट डॉ अरमीन हक म्हणाले की, ‘या देशांचात्यातील तत्वांचा मनापासून आदर करून तुमच्या जवळच्या गोष्टीबबद्धल आदर बाळगावा. गुरुदेवता व आई वडिलांना कधीही उलट प्रश्न न करता केवळ कृतीतून शिकणे गरजेचे आहे.’ पिठाडीया फौंडेशनचे चेअरमन डॉ.दिलीप पिठाडीया म्हणाले की, ‘या तंत्रपरिषदेचा हेतू खूप महान असून ही परिषद अत्यंत मैत्रीपूर्ण वातावरणात पार पडली. आपण समाजाचा काहीतरी देणं लागतो या भावनेने प्रत्येक कार्य केले पाहिजे.’ अमेरिकेतील साऊथ डीकोटा विद्यापीठाचे डॉ. संतोष के.सी. म्हणाले की, ‘तंत्रपरिषदेला उपस्थित राहणे हाच सन्मान असून मी पाहिलेल्या अनेक परिषदांपैकी ही सर्वात मोठी परिषद आहे. यातून नवीन गोष्टी शिकण्यास मिळाल्या असून नवीन काहीतरी करण्याची मानसिकता निर्माण झाली आहे.
बी.ए.आर.सी.चे डॉ. गुलशन रेलहान यांनी आपल्या भाषणातसंशोधकांनी विविध नवीन कल्पना मांडून त्यावर संशोधन करावे. आणि अभियंत्यांनी त्या कल्पना प्रत्यक्षात आणाव्यात. यातून नॅनो तंत्रज्ञानाचा अधिकाधिक विकास व्हावा’ अशी अपेक्षा व्यक्त केली. बल्गेरियातील सोफिया विद्यापीठाचे डॉ. झ्लात्का व्हाजारनिस म्हणाले की, ‘या ठिकाणी अनेक नाविन्यता पाहायला मिळाली असून या परिषदेचा सामाजिक दृष्टीकोन खरोखरच स्वागतार्ह आहे.’ डॉ. डी.व्ही.पाटील म्हणाले की, ‘या तंत्रपरिषदेत सादर केलेले शोध निबंध कॉपीराईटने संरक्षित करावे.’ संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी.बी. नाडगौडाडॉ. यु डी. पाटील आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषदेचे समन्वयक डॉ. प्रशांत पवार यांनी देखील महत्वपूर्ण माहिती दिली. काही नव संशोधकांचे उत्कृष्ठ सादरीकरण केल्याबद्धल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. एकूणच यतंत्रपरिषदेमुळे उपस्थितांमध्ये उर्जा आली. आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषद संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषदेचे समन्वयक डॉ. प्रशांत पवार यांच्या नेतृत्वखालीतसेच प्रत्येक समितीमधील प्रमुख व त्यातील सदस्यांनी दिलेल्या अभूतपूर्व योगदानामुळे अत्यंत यशस्वीपणे पार पडली. तंत्रपरिषदेमध्ये मांडलेल्या संशोधन विषयांची चर्चा अनेक दिवस चालणार हे मात्र नक्की !

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *