👁 7 Views

प्रधानमंत्री मुद्रा लाभार्थी योजना लाभार्थी मनीषा कानगुडे यांची यशकथा

पंढरपूर LIVE 8 जानेवारी 2019

प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे स्‍वयंपूर्ण – मनीषा कानगुडे

            प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेऊन स्‍वत:च्‍या पायावर उभ्‍या झालेल्‍या मनीषा विलास कानगुडे यांची कहानी सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. मनीषा यांनी फुरसुंगी ढमाळवाडी येथे एंजेल बुटीक्‍स ॲण्ड लेडीज शॉपी हे दुकान सुरु करुन प्रगतीच्‍या मार्गावर वाटचाल सुरु केली आहे.
            आपल्‍या प्रवासाविषयी मनीषा कानगुडे सांगतात, मी 2016 मध्‍ये पेपरमध्‍ये प्रधानमंत्री मुद्रा योजनेची जाहिरात वाचली. त्‍यानंतर मी घराजवळच्‍याच बँक ऑफ महाराष्‍ट्रच्‍या फुरसुंगीच्‍या शाखेत चौकशीसाठी गेले. तेथे बँक मॅनेजर लखपती हे होते. त्‍यांनी योजनेची सविस्‍तर माहिती सांगितली.  मी टेलरिंगचे काम करत होते. भरतकाम, वीणकाम मला येत होते. 


साड्यांवर, ब्‍लाऊजवर भरतकाम, वीणकाम करुन छोटेखानी व्‍यवसाय चालू होता. पण मला भांडवल मिळाले तर माझा व्‍यवसाय वाढू शकत होता. प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे माझ्या आशा पल्‍लवीत झाल्‍या. लखपती साहेबांनी सांगितल्‍यानुसार मी कर्जप्रकरण तयार केले. कर्जाची प्रक्रिया चालू असतांनाच त्‍यांची बदली झाली. मला थोडं टेन्‍शन आले. लखपती साहेबांच्‍या जागेवर सोमनाथ ससाणे साहेब आले, त्‍यांनी कर्जप्रकरण मंजूर केले. सप्‍टेंबर 2016 मध्‍ये पहिल्‍यांदा दीड लाखाचे कर्जमंजूर झाले. माझ्याजवळचे भांडवल आणि कर्ज दोन्‍ही एकत्र करुन मी घराजवळच (लिटील फ्लॉवर स्‍कूल जवळ) एंजेल बुटीक्‍स अॅण्‍ड लेडीज शॉपी हे दुकान सुरु केले.


मनीषा कानगुडे या मूळच्‍या करमाळा तालुक्‍यातील सरबडोह (जि. सोलापूर) येथील आहेत. त्‍यांचे शिक्षण सातवीपर्यंतच झाले. पण लहानपणापासून शिवणकाम, वीणकामाची आवड होती. काही दिवस मुंबईला राहिल्‍यानंतर गेल्‍या 18-19 वर्षांपासून पुण्‍यात राहत आहेत. प्रारंभी घरगुती शिवणकाम तसेच तोरण, लोकरीच्‍या वस्‍तू विक्री  करुन त्‍या उदरनिर्वाह करत होत्‍या.  या छोटेखानी व्‍यवसायातून त्‍यांना दरमहा 5 हजार इतका नफा मिळायचा. कर्ज मिळाल्‍यानंतर त्‍यांनी व्‍यवसाय वाढवला. दुकानात फॉल, अस्‍तर, धागा, लेस, लटकन, कॅन्‍व्‍हॉस, मॅचींग ब्‍लाऊजपीस, डिझाईन ब्‍लाऊज पीस, होजिअरी, ओढणी, स्‍टोल, स्‍कार्फ अशा वस्‍तू विक्रीसाठी ठेवल्‍या. त्‍यामुळे पहिल्‍या सहा महिन्‍यात त्‍यांची उलाढाल 5लाखापर्यंत वाढली. गेल्‍या वर्षी ती 15 लाखापर्यंत वाढल्‍याचे सांगतात.
            प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे व्‍यवसाय वाढीला भांडवल मिळालेच पण आत्‍मविश्‍वास वाढून आर्थिक प्रगतीही झाली. स्‍वयंपूर्ण होण्‍याची मनीषा कानगुडे यांची मनीषा पूर्ण झाली. 


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *