👁 9 Views

आंबेकर-आजरेकर फडाच्या वतीने विद्याधर ताठे यांचा वारकरी भुषण पुरस्काराने गौरव

पंढरपूर LIVE 8 जानेवारी 2019

आंबेकर-आजरेकर फडाने संतांच्या संस्काराची परंपरा जिवापाड जपली आहे-ना.विजयकुमार देशमुख 

आंबेकर-आजरेकर फडाने संताच्या संस्काराची परंपरा जिवापाड जपली असून या सप्ताह सोहळ्याच्या निमित्ताने फडाच्या वतीने दिला जाणारा वारकरी भूषण पुरस्कार ज्येष्ठ संपादक विद्याधर ताठे यांना माझ्या हस्ते प्रदान करण्याचा निर्णय घेतला हे खरे तर माझे भाग्य आहे.राजकारणाच्या धावपळीत संताच्या मांदीयाळीत वेळ व्यतीत करावयास मिळतो आहे तोही पांडुरंगाच्या दरबारात हे क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहेत असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजयकुमार देशमुख यांनी केले.आंबेकर-आजरेकर फडाच्या वतीने आयोजीत सप्ताह सोहळ्यानिमित्त दिल्या जणार्‍या वारकी भुषण पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.प्रशात परिचारक हे होते.यावेळी प्रमु पाहुणे म्हणून ऍड.उमेश मराठे,ह.भ.प.अनिल महाराज बडवे,ह.भ.प.रामकृष्ण वीर,ह.भ.प.महेश महाराज भोसेकर,मंदीर समिती सदस्या शकुंतला नडगीरे आदी उपस्थित होते.
     या पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलताना आ.प्रशांत परिचारक म्हणाले की,वारकरी भुषण पुरस्कारासाठी विद्याधर ताठे यांची करण्यात आलेली निवड अतिशय योग्य असून वारकरी सांप्रदायाचा दांडगा अभ्यास आणि व्यासंग असलेल्या आणि इतरही साहित्याचा प्रचंड अभ्यास असलेले विद्याधर ताठे यांचे कार्य खुप मोठे आहे.यावेळी ऍड.उमेश मराठे,आशुतोष देशपांडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. 
        

आंबेकर आजरेकर फडाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी येथील श्री विठ्ठल मंदीराच्या सभामंडपात हरिनाम सप्ताह,किर्तन आणि प्रवचन व भागवत कथा सोहळा आयोजीत केला होता.आठ दिवस या सप्ताह सोहळ्यात अनेक नामवंत किर्तनकार,प्रवचनकार व भागवतकथाकार यांनी श्री विठ्ठलाच्या साक्षीने सेवा अर्पण केली.या सप्ताह सोहळ्याच्या निमित्ताने प्रतिवर्षी आंबेकर-आजरेकर फडाच्या वतीने वारकरी साप्रदायाच्या प्रसारासाठी कार्य करणार्‍यांना महनिय व्यक्तींना वारकरी भुषण पुरस्कार प्रदान करण्यात येता अशी माहीती यावेळी ह.भ.प.भागवत महाराज चवरे यांनी दिली.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भागवताचार्य सुधाकर महाराज इंगळे यांनी केले तर शेवटी आभार प्रदर्शन ह.भ.प.कृष्णा महाराज चवरे यांनी केले. 
      


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *