👁 10 Views

अर्जुनाच्या धनुर्विद्या सारखी पत्रकारिता जपा : ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे ‘‘पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र व पत्रकार सुरक्षा समितीच्या संयुक्त विद्यमाने पंढरीत पत्रकार दिन उत्साहात साजरा!’’

पंढरपूर LIVE 7 जानेवारी 2019

पत्रकार बांधवांनी आपल्या पत्रकारितेचे पावित्र्य जपावे. आपल्या स्वार्थासाठी सत्तेवर असलेले राजकारणी पत्रकारांना निसंग करण्याचा वारंवार प्रयत्न करतात. यासाठी महाभारतातील वीर पुरुष अर्जुनाची जितकी श्रद्धा आणि विश्वास आपल्या धनुर्विद्येवर होता त्याच न्यायाने पत्रकारांनी आपली पत्रकारिता जपली पाहिजे. असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे यांनी केले. ते पंढरपूर येथील पंढरपूर पत्रकार सुरक्षा समिती व महाराष्ट्र राज्य पत्रकार संरक्षण समिती पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर पत्रकार भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.  अध्यक्षीय भाषणात बोलताना त्यांनी आपल्या पत्रकारितेतील बरे-बाईट अनुभव सांगुन अनेक आठवणींना उजाळा दिला. पत्रकारांनी पत्रकारितेचे पवित्र जपून पत्रकारांना विसंग करू पाहणार्‍या राजकारण्यांपासून सावध राहण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. 
रविवार दिनांक 6 जानेवारी रोजी पंढरपूर येथील नगर परिषदेच्या पत्रकार भवनामध्ये पंढरपूर पत्रकार सुरक्षा समिती व महाराष्ट्र राज्य पत्रकार संरक्षण समिती पंढरपूर यांच्या संयुक्त वतीने पत्रकार दिनानिमित्त आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर दर्पण दिन साजरा करण्यात आला. पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.  या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून त्या उपस्थित होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे हे होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, ज्येष्ठ पत्रकार अशोक गोडगे आणि नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर आदी उपस्थित होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, जेष्ठ पत्रकार अशोक गोडगे, नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष भगवान वानखेडे यांनी केले तर आभार पत्रकार सुरक्षा समितीचे पंढरपूर अध्यक्ष रामभाऊ सरवदे यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु.विनया उत्पात यांनी केले.

पत्रकारांची लेखनी भल्या-भल्या राजकारण्यांना तारते 
– नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले

लोकशाहीतील पत्रकारिता ही लोकशाहीची जीवनवाहिनी आहे. समाजातील सर्वच घटकांना पत्रकारिता तारण्याचे काम करते. प्रशासनात काम करताना राजकारण्यांनाही असंख्य अडचणी येतात, प्रशासनातील नियम लोककल्याणाच्या जेंव्हा आड येतात त्यावेळेस फक्त पत्रकारिताच राजकारण्यांना तारू शकते. यामुळे भल्या भल्या राजकारण्यांची झोप उडविणारी पत्रकरिता याच भल्याभल्यांना तारक ठरते. असे मत पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांनी व्यक्त केले. पत्रकारांना दूर ठेवू इच्छिणार्‍या राजकारण्यांना ही गोष्ट अशक्यप्राय असून प्रशासनात काम करताना ज्यावेळी राजकारण्यांना अडचणी येतात त्यावेळेस लोककल्याणा चा ध्यास घेतलेले पत्रकार मित्र राजकारण्यांना तारुन नेतात असे मत त्यांनी व्यक्त केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पत्रकारिता करणारे पत्रकार बांधवांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. 

   यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. सागर कवडे, पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले,  ज्येष्ठ पत्रकार अशोक गोडगे, पंढरपूर नगरपरिषदेची उपमुख्य अधिकारी सुनील वाळुजकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. पत्रकारांना सन्मानित करणार्‍या या कार्यक्रमात पंढरपूर येथील ज्येष्ठ पत्रकार शेखर जोशी, भाऊ तेलंग, प्रकाश पटवर्धन, नंदकुमार देशपांडे यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक बा.ना. धांडोरे यांचा सन्मान करण्यात आला.


 यावेळी पंढरपूर पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष रामभाऊ सरवदे, पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हा अध्यक्ष भगवान वानखेडे,पंढरपूर अध्यक्ष वीरेंद्र उत्पात, पत्रकार सुरक्षा समिती अध्यक्ष अपराजित सर्वगोड, अविनाश साळुंखे, शंकरराव कदम, संतोष कांबळे, श्रीकांत कसबे,गौतम जाधव, धीरज साळुंखे, नंदकुमार देशपांडे, जैनुद्दीन मुलाणी, शंकर पवार, बालाजीसिंह परदेशी, विक्रम कदम,श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विनायक हरिदास, यशवंत कुंभार, बाहुबली जैन, अमोल कुलकर्णी, चैतन्य उत्पात, विजयकुमार कांबळे, राधेश बादले पाटील, रामकृष्ण बिडकर, शंकर पवार, दत्ताजी पाटील, विश्वास पाटील, श्रीनिवास उपळकर, संजय यादव, लक्ष्मण जाधव, अमोल गुरव, दादा कदम, राजेंद्र कोरके पाटील, कुमार कोरे आदींसह अनेक पत्रकार बंधु उपस्थित होते.



महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *