👁 10 Views

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मेंढापूर येथे १९ जानेवारी पासून विशेष श्रमसंस्कार शिबिर

पंढरपूर LIVE 17 जानेवारी 2019


    पंढरपूर:  येथील रयत शिक्षण संस्थेचे  कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय व सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने  मेंढापूर येथे १९ जानेवारी २०१९ ते २५ जानेवारी २०१९  या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजनेचचे  विशेष श्रमसंस्कार शिबिर ‘वृक्षारोपण व वृक्षासंवर्धन, जलव्यवस्थापनासाठी युवक, स्वच्छ भारत अभियान ’ या विषयावर  आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उदघाटन रयत शिक्षण संस्था साताराचे  मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व माजी आयुक्त मा. प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे  आहेत.  प्रमुख पाहुणे राज्यसभा माजी खासदार मा. रणजितसिंह मोहिते पाटील, कल्याण काळे, राजाबापू पाटील, वसंतनाना देशमुख, राजेंद्र पाटील, आर. डी. पवार, सौ. अर्चना विष्णू पाटोळे, सौ. जाई दिलीप कोरके, सचिन नवनाथ शिंदे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.  या शिबिरात श्रमदान, मोफत पशुवैद्यकीय शिबीर, आरोग्य शिबीर, स्त्री-पुरुष समानता, ग्राम सर्वेक्षण, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, शेतकरी मेळावा, पाणी आडवा पाणी जिरवा एड्स प्रबोधन रॅली असे उपक्रम आयोजित केले आहेत. महाविद्यालयातील   स्वयंसेवक-स्वयंसेविका  सहभागी होणार आहेत. या कालावधीत प्राचार्य शिवाजीराव सोनावणे, परशुराम कोरे, डॉ. राजेंद्र जाधव,अनिल केंगार, मारुती कौलगे, डॉ. डी. बी. मासाळ, प्रा. जव्हार मोरे, डॉ. समाधान माने, डॉ. एम. टी. बचुटे, समाधान काळे, नानासाहेब कदम, डॉ. व्ही. बी. पाटील, डॉ.सौ. साधनाताई उगले, अमरजित पाटील हे मान्यवर मार्गदर्शन  करणार आहेत. समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे सोलापूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, अध्यक्ष पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा आमदार भारतनाना भालके यांच्या उपस्थित संपन्न होणार आहे.  राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी  डॉ. एस. पी. शिंदे, एन. एस. एस. च्या सोलापूर विद्यापीठ विभागीय समन्वयक डॉ. चंद्रकांत काळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ एफ. एस. विजापुरे यांनी आयोजन केले आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे  यांनी दिली.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *