👁 10 Views

पंढरपूर सिंहगड मध्ये स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी

पंढरपूर LIVE 17 जानेवारी 2019

पंढरपूर (प्रतिनिधी) एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयात प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

   भारतभूमी व हिंदु धर्म यांच्या उद्धारासाठी अहर्निश चिंता वहाणारी आणि तनमनधन व प्राण याच उद्धारकार्यासाठी अर्पण करणारी काही नवरत्‍ने भारतात होऊन गेली. त्यांपैकी एक दैदिप्यमान रत्‍न म्हणजे स्वामी विवेकानंद होय. धर्मप्रवर्तकतत्त्वचिंतक,विचारवंत म्हणून विवेकानंदांचे नाव सर्व जगात प्रसिद्ध आहे. ऐन तारुण्यात संन्यासाश्रमाची दीक्षा घेऊन हिंदु धर्माचे प्रसारक बनलेल्या तेजस्वी व ध्येयवादी व्यक्‍तीमत्त्व म्हणजे स्वामी विवेकानंद आहे. त्यांच्या जयंतीच्या दिवशी`आंतरराष्ट्रीय युवकदिनसाजरा करण्यात येतो. स्वातंत्र्यानंतर भारतभूमी व हिंदु धर्म यांची झालेली दुरवस्था रोखण्यासाठी आजही स्वामी विवेकानंद यांच्या तेजस्वी विचारांची गरज असल्याचे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी व्यक्त केले. यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या कार्याची माहिती देण्यात आली.
     यावेळी महविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थितीत होते.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *