पंढरपूर LIVE 17 जानेवारी 2019
स्वेरीचे डॉ. प्रशांत पवार यांची इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) च्या ‘एरोस्पेस इंजिनिअर्स डिव्हिजन’ विभागामध्ये ‘सदस्य’म्हणून बिनविरोध निवड झाल्यामुळे त्यांचा सत्कार अमेरिकन विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. पीटर कुझनिक यांच्या हस्ते करण्यात आळा यावेळी सोबत डावीकडून सोलापूर विद्यापीठाचे डॉ.एस.के. पवार, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, विशेष कार्याधिकारी डॉ. व्ही.बी.पाटील संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा आदी.
पंढरपूर-येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार यांची इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) अर्थात आय.इ.आय. (इंडिया) या महाराष्ट्र स्टेट सेंटरच्या ‘एरोस्पेस इंजिनिअर्स डिव्हिजन’विभागामध्ये ‘सदस्य’ म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्याचे इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअर्सचे चेअरमन डॉ. एच.एम.राजे यांच्या प्रमुख उपस्थितीत २८ आक्टोंबर २०१८ रोजी नागपूर मध्ये झालेल्या आय.इ.आय. च्या वार्षिक सर्व साधारण सभेत याची घोषणा करण्यात आली. या निवडीचा कालावधी २०१८ ते २०२० असा राहणार आहे. या माध्यमातून विविध विषयाचे स्वेरीच्या शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व विविध कार्यक्रमासाठी निधी प्राप्त होणार आहे. डॉ. प्रशांत पवार यांनी शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर मधून २००० साली सिव्हील इंजिनिअरिंगची पदवी संपादित केली. त्यानंतर गुवाहाटी मधील इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजी येथून एम.टेक.ही पदव्युत्तर पदवी मिळविल्यानंतर देशाच्या अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या इंडियन इन्सिटटयुट ऑफ सायन्स, बेंगलोर येथून‘हेलिकॉप्टर’ या विषयावर त्यांनी पी.एच.डी. केली.त्यांच्या पी.एच.डी. करीता त्यांना गोल्ड मेडल मिळाले आहे.
तसेच कोन्कुक विद्यापीठ, सेऊल (दक्षिण कोरीया)येथून पोस्ट डॉक्टरेटही पूर्ण केले आहे. त्यांन‘युवा शास्त्रज्ञ’ म्हणून भारत सरकारच्या सायन्स व टेक्नोलॉजी मंत्रालयाने देखील गौरविले आहे. ते मागील १२ वर्षापासून येथील श्री विठ्ठल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये संशोधन विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. त्यांची आतापर्यंत ३ पुस्तके, ४३ आंतरराष्ट्रीय जर्नल पेपर्स,प्रकाशित झाले असून १ पेटंट देखील त्यांच्या नावे आहे. तसेच त्यांचे स्प्रींगर या इंग्लड येथील आंतरराष्ट्रीय प्रकाशन तर्फे हेलिकॉप्टर विषयावरील पुस्तक प्रकाशित केले आहे. त्याबरोबरच त्यांच्या मार्गदर्शनाखाली ५ विद्यार्थ्यांनी पी.एच.डी. पदवी संपादित केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी मार्गदर्शन केलेल्या विद्यार्थ्यांचे पी.एच.डी. प्रबंध देखील सामाजिक प्रश्न हे तंत्रज्ञानामार्फत सोडविण्याच्या विषयावरच आधारित आहे. त्यांनी कोरीया, कॅनडा,अमेरीका, फ्रान्स, चीन व दुबई मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोध निबंध सादर केले आहेत. २०१६ आणि २०१८ या दोन वर्षी स्वेरीमध्ये‘टेक्नोसोसायटल’ ही आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी नियोजन केले होते. या परिषदेच्या माध्यमातून देश व परदेशातील शास्त्रज्ञांना पाचारण करून संशोधनाविषयी महत्वाची भूमिका बजावली.
तसेच त्यांनी गेल्याच आठवड्यात दिल्ली येथील केंद्र सरकारच्या ‘डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँण्ड टेक्नोलॉजी’च्या ‘ फंड फॉर इंप्रुव्हमेंट ऑफ सायन्स अँण्ड टेक्नोलॉजी (फिस्ट)’इन्फ्रास्ट्रक्चर योजना अंतर्गत स्वेरीला ६० लाख रुपयांचा निधी मिळविला असून या निधीसह स्वेरीला त्यांनी आजपर्यंत जवळपास ६.४५ कोटी रुपये इतका निधी मिळविण्यासाठी महत्वाची भूमिका घेतली आहे. या बिनविरोध निवड झाल्यामुळे डॉ. पवार यांचे अमेरिकन विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. पीटर कुझनिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. या निवडीमुळे डॉ. पवार यांचे स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा, उपाध्यक्ष आर.बी. रिसवडकर, इतर पदाधिकारी,विश्वस्त, संस्थेंअंतर्गत असणाऱ्या बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस.डी. सोनवणे, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com