👁 9 Views

राष्ट्रीय शिक्षा अभियानातील योजनेचे ‘केबीपी’ मध्ये रविवारी उद्घाटन.. पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरमधून व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून साधणार विद्यार्थ्यांशी संवाद

पंढरपूर LIVE 1 फेब्रुवारी 2019                 

   फाईल चित्र- पंतप्रधान नरेंद्र मोदी

सोलापूरदि. 01- राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियाना योजनेतील रुसा अंतर्गत काम्पोनन्ट 8अन्वये पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाला स्वायत्त महाविद्यालय म्हणून  5 कोटी रुपयाचे अनुदान मंजूर झाले आहे. या योजनांचे शिलान्यास अनावरण व उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.. 
राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियाना योजनेतील रुसा अंतर्गत काम्पोनन्ट अन्वये सोलापूर विद्यापिठातून रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील (केबीपी) महाविद्यालयाची निवड झाली आहे. हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या बॅरिस्टर पी.जी. पाटील सभागृह येथे दुपारी 3.00 वाजता होणार आहे. यावेळी पंतप्रधान हे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी श्रीनगरजम्मू काश्मीर येथून व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. तसेच शैक्षणिक समस्या जाणून घेणार आहेत. या व्हिडीओ कॉन्फरसिंगसाठी महाविद्यालयातील  130 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.                        
राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियाना योजनेतील रुसा अंतर्गत काम्पोनन्ट या योजनेतंर्गत महाविद्यालयात शैक्षणिक व संशोधन उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये उद्योजक आणि व्यक्तीमत्व विकास प्रकल्पाचा समावेश असणार आहे. 
      या कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष साधना भोसलेजिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसलेविभागीय उच्च शिक्षण सह संचालक डॉ.श्रीनिवास धुरे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *