पंढरपूर LIVE 1 फेब्रुवारी 2019
सोलापूर,दि. 1 :- शहरातील एन.जी.मिलच्या जागेवर सर्व शासकीय कार्यालयासाठी प्रशासकीय इमारत उभारण्याचे नियोजन आहे,असे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी आज येथे सांगितले.
जिल्हा कोषागार कार्यालयातील प्रशिक्षण सभागृहाचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासअतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, नाशिकचे मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल पारखे, कार्यकारी अभियंता विलास मोरे, जिल्हा परिषदेचे वित्त व लेखाधिकारी महेश अवताडे, जिल्हा कोषागार अधिकारी राहुल कदम आदी उपस्थित होते.
श्री. भोसले म्हणाले, ‘शहरातील मध्यवर्ती असलेल्या एन.जी. मिलच्या जागेवर सीबीडीच्या (सेंट्रल बिजनेस डिस्ट्रीक्ट) संकल्पनेवर प्रशासकीय इमारत उभारली जाईल. या इमारतीत सर्व प्रमुख शासकीय कार्यालये असतील यामुळे नागरिकांना त्यांच्या कामासाठी ठिकठिकाणी जावे लागणार नाही. या इमारतील परीसरात शासकीय कामानिमित्त येणाच्या नागरिकांना आवश्यक सोयी सुविधाही पुरविण्यात येतील.’
जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, ‘सामान्य नागरिक, शेतकरी व अन्य घटकांना शासन योजनांचा लाभ देण्यासाठी शासनाच्यावतीने निर्णय घेतले जातात. या निर्णयांचा अर्थ समजून घेऊन सामान्यांना न्याय दिला पाहिजे. नियमांचा हेतू समजल्यास लाभार्थीना न्याय व योजनेचा लाभ होईल. कोषागार कार्यालयामध्ये एक चांगला प्रशिक्षण हॉल झाला असून या ठिकाणी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची उत्तम सोय होणार आहे.’
अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे म्हणाले, नागरिकांना उत्तम व विहित मुदतीत सेवा देण्यासाठी अधिकारी-कर्मचारी यांना नवीन नियमांची माहिती होणे आवश्यक असते. यासाठी त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्यासाठी चांगला हॉल व प्रशिक्षणासाठी सोयी-सुविधा उपलब्ध होणे आवश्यक असतात. कोषागार कार्यालयात नवीन बांधण्यात आलेल्या प्रशिक्षण हॉलमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षाणाची सोय जिल्ह्यात झाली आहे.
नाशिकचे मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल पारखे, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, कार्यकारी अभियंता विकास मोरे, जिल्हा परिषदेचे वित्त व लेखाधिकारी महेश अवताडे यांनी मनोगत व्यक्त करुन अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोषागार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कोषागार अधिकारी राहुल कदम यांनी प्रास्ताविक केले तर सहाय्यक कोषागार अधिकारी सूर्यकांत खटके यांनी सूत्रसंचालन केले.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com





