पंढरपुर (प्रतिनिधी):- गेल्या पाच दिवसापासून पंढरपुर तहसील कार्यलय बाहेर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आनंद लोंढे हे विविध सामाजिक मागण्यासाठी आमरण उपोषणास बसलेले होते, सोमवारी दुपारी त्यांची तब्येत खूपच खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना कोणत्याही परिस्थिती अॅडमिट करावे लागेल असे कळवल्यानंतर पंढरपुर शहर पोलिसांनी जबरदस्तीने उपजिल्हा रुग्णालय येथे लोंढे यांना अॅडमिट केले.
यावेळी कार्यकर्ते व पोलीस यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली, लोंढे यांनी रुग्णालयातच आपले उपोषण चालू ठेवल्याने रात्री उशिरा 10 वाजता नायब तहसीलदार तिटकारे, होळे गावचे सरपंच तानाजी भुसनर,तलाठी काझी, ग्रामसेवक कोरके, पोलीस कर्मचारी माळी, शिंदे, कोळवले यांनी उपजिल्हा रुग्णालयामध्ये जाउन मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देऊन उपोषण सोडण्याची विनंती केली. नायब तहसीलदार यांच्या हस्ते लिंबू पाणी देऊन उपोषण सोडण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष अक्षय वंसाळे,तालुका अध्यक्ष वैभव वाघमारे,PRP चे महेंद्र जाधव आदींसह होळे ग्रामस्थ उपस्थीत होते.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com






