पंढरपूर LIVE 6 फेब्रुवारी 2019
गोविंदपूर येथील श्री गणेश मंगल कार्यालयात युवकांसाठी नौकरी आणि व्यवसाय मार्गदर्शनाचे आयोजन दुनियादारी फौंडेशनच्या वतीने करण्यात आले ,मार्गदर्शक श्री पवनकुमार झंवर (C, A),श्री हरी लबडे(CA),श्री राजेश हुंडेकरी(Icici bank maneger),व श्री मिलिंद तानवडे( कर सल्लागर) यांनी यथोचित मार्गदर्शन केले ,यावेळी अध्यक्ष स्थानी फौंडेशन चे संस्थापक श्री गणेश महाराज कराडकर होते.
श्री झंवर सर यांनी “नव दिशा व नव प्रेरणा” या विषयावर बहुमोल मार्गदर्शन केले,श्री हरी लबडे यांनी “वित्तीय व औधोगिक क्षेत्रातील संधी” या विषयावर, तर श्री राजेश हुंडेकरी यांनी “बँकिंग क्षेत्रातील संधी अर्थसहाय्य”या विषयावर, तर श्री मिलिंद तानवडे यांनी ” करियर करियर म्हणजे काय रे भाऊ ” या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले.
यावेळी श्री झंवर सर यांचा सत्कार श्री सौरभ थिटे पाटील,श्री हरी लबडे यांचा सत्कार सचिव श्री नागेश बागडे,श्री राजेश हुंडेकरी यांचा सत्कार श्री विठ्ठल महाराज चवरे तर श्री मिलिंद तानवडे यांचा सत्कार पत्रकार श्री रामकृष्ण बिडकर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रजवलन व प्रतिमा पूजनाने झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फौंडेशनचे मार्गदर्शक श्री ह भ प राणामहाराज वासकर यांनी केले ,पाहुण्यांचे स्वागत व परिचय श्री ह भ प चैतन्य महाराज देहूकर यांनी केले,तर आभार प्रदर्शन फौंडेशन चे अध्यक्ष श्री महेश काळे यांनी केले ,कार्यक्रमास पंढरीत बहुसंख्य युवक, युवती उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com







