👁 8 Views

पेटीएम मनीची म्युच्युअल फंड ग्राहकांसाठी नवी सुविधा

पंढरपूर LIVE 6 फेब्रुवारी 2019

                    
~ एसआयपीची आत्ता नोंदणी करा, पैसे मागाहून द्या’ हे फीचरची सुरुवात ~
मुंबई, ६ फेब्रुवारी २०१९: म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठीचा भारताचा सर्वात मोठा मंच पेटीएम मनी ने आज “एसआयपी ची नोंदणी आत्ता करा, पैसे मागाहून द्या” ही नवीन सुविधा आपल्या ग्राहकांसाठी सुरू करीत असल्याचे जाहीर केले. या नवीन फीचरमुळे सर्व गुंतवणूकदारांना आता हा पर्याय आहे की, तत्काळ पेमेंट करण्याव्यतिरिक्त पैसे मागाहून देण्याचा पर्याय निवडून आपल्या एसआयपी गुंतवणुकीची सुरुवात करू शकतात. हा पर्याय निवडणा-या, वापरकर्त्यांसाठी पेटीएम मनी त्या म्युच्युअल फंडसाठीचे पहिले पेमेंट यशस्वीरीत्या केल्यानंतर एसआयपी एएमसीकडे नोंदणीसाठी पाठवते.                        

पेटीएम मनीचे पूर्ण वेळ संचालक प्रवीण जाधव म्हणाले, “पेटीएम मनी आपल्या गुंतवणूकदारांना एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये पद्धतशीर गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देते आणि आम्हाला हे पाहून आनंद होतो की आमचे ७५% पेक्षा जास्त गुंतवणूकदार एसआयपीचा पर्याय निवडत आहेत. “एसआयपी ची नोंदणी आत्ता करा, पैसे मागाहून द्या” या फीचरमुळे असे गुंतवणूकदार ज्यांना एसआयपीद्वारे गुंतवणूक करण्याची इच्छा असते पण नोंदणीच्या वेळी पैशांची सवड नसते, ते आता मागाहून पैशाची सोय झाल्यानंतर पेमेंट करण्याचा पर्याय निवडू शकतात. आपल्या वापरकर्त्यांना एसआयपी व्यवस्थापनाचा उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी पेटीएम मनी या क्षेत्रात नवनवीन उपक्रम करतच राहील.”

ज्या गुंतवणूकदारांनी आपल्या एसआयपीसाठी ऑटो-पे सक्रिय केलेले आहे, त्यांची रक्कम ठराविक एसआयपी तारखेस आपोआप गुंतवली जाईल. तर, ज्या गुंतवणूकदारांनी युपीआय किंवा नेट बँकिंगद्वारे पेमेंटचा पर्याय मान्य केलेला असेल त्यांना ठराविक तारखांना त्यांच्या एसआयपीचे पेमेंट करण्याची आठवण दिली जाईल.   


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *