👁 7 Views

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री व बांधकाम मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानेच राज्यात आंदोलनाचा भडका उडाला होता- रामभाऊ गायकवाड

Pandharpur LIVE 18 February 2019

पंढरपूर : मराठा समाज आरक्षण आंदोलना दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळेच राज्यात आंदोलनाचा भडका उडाला होता. या आंदोलनाचा गैरफायदा घेत त्यांच्याच कार्यकर्त्यांनी बसेस फोडल्याचा आरोप राज्य मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विविध मागण्यांवरती चर्चा करण्यासाठी आज येथील श्रीराम मंगल कार्यालयात  राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीनंतर रामभाऊ गायकवाड यांनी पत्रकारांसमोर मराठा समाजाची भूमिका मांडली.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details…➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान मराठा समाज कार्यकर्त्यांवर पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे लोकसभा निवडणूकीची आचार संहिता लागू होण्यापूर्वी मागे घ्यावेत, अन्यथा राज्यातील मराठा समाज लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कमळ चिन्हावर बहिष्कार टाकेल, असा इशाराही यावेळी रामभाऊ गायकवाड यांनी दिला. मराठा समाजाला आरक्षण लागू करावे या मागणीसाठी राज्यभर मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन केले होते. आंदोलन दरम्यान एसटीबसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होेते. या नुकसानीस जबाबदार धरुन राज्यातील 13 हजार 792  मराठा तरुणांवर सरकारने गुन्हे दाखल केले आहेत. 

पोलिसांनी जाणूनबुजून  दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. गुन्हे मागे घेण्याचे केवळ आश्वासन दिले आहे. अद्याप एक ही गु्न्हा मागे घेतला नाही.त्यामुळे मराठा तरुणांमध्ये सरकार बद्दल रोष वाढला आहे. लोकसभा निवडणूकीची आचार संहिता लागू होण्यापूर्वी राज्य शासनाने मराठा समाजातील तरुणांवर दाखल केले गुन्हे मागे घ्यावेत, आरक्षण मागणीसाठी बलिदान दिलेल्या 24 हुतात्म्यांना 10 लाखांची मदत आणि वासरला सरकारी नोकरी द्यावी. अन्यथा लोकसभा निवडणुकीत  भाजपच्या विरोधात मतदान करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी आचारसंहितेपूर्वी मराठा समाजाच्या मागण्यापूर्ण केल्या तर भाजपच्या बाजूने मराठा समाज मतदान करेल असेही यावेळी श्री. गायकवाड यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रज्ञा जाधव, विनोद पोखरकर, नवनाथ माने, समाधान फाटे आदी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *