Pandharpur LIVE 18 February 2019
माघ वारीसाठी आलेल्या लाखो भाविकांना प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका बसला आहे. ऐन एकादशीच्या मुख्य दिवशी विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेजवळील वीज वितरण कंपनीच्या विद्युत रोहित्राला (डीपी ) आग लागली. त्यामुळे वारकरी गोंधळून गेले. मात्र वेळीच स्थानिकांनी आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details…➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com
येथील चंद्रभागा घाटाजवळून श्री विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग जाते. एकादशीच्या दिवशी रात्री आठच्या दरम्यान या ठिकाणी वीज वितरण कंपनीच्या विद्युत रोहित्राने पेट घेतला आणि या परिसरातील वीज गायब झाली. त्यामुळे दर्शन रांगेत उभे असलेले भाविक घाबरून गेले. मात्र स्थानिक रहिवाशांनी परिस्थिती पाहून तातडीने आग विझवण्यास सुरवात केली आणि अग्निशमन दलाला बोलाविण्यात आले. याच वेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले घटनास्थळी आले आणि भाविकांना दिलासा देत दर्शन रांग पूर्ववत केली.



