👁 7 Views

महाफार्मचे सहकार मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Pandharpur LIVE 3 March 2019

मुंबई-  ग्राहकांना कृषी उत्पादके रास्त दरात मिळावे या उद्देशाने मुंबईत पहिल्यांदा महाफार्मची सुरूवात करण्यात आली आहे. कृषी उत्पादन थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवून शेतक-यांना नफा मिळवून देण्याचा शासनाचा मानस आहेअसे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या सहकार विकास महामंडळाच्यावतीने कुलाबा येथील सहकार भांडारमध्ये कृषी उत्पादके विक्रीसाठी महाफार्म सुरू करण्यात आले आहे. या महाफार्मचे उद्घाटन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहकार भांडारचे अध्यक्ष संजय शेट्टे उपस्थित होते.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 


राज्यातील पाच हजार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी शासनाने अटल महापणन विकास अभियान सुरू केले आहे. या अभियानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या एक हजार ग्राम सामाजिक परिवर्तनाचा सुध्दा समावेश आहे. या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कृषी मालास बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि शेतकऱ्यांना थेट नफा मिळावा म्हणून महाफार्म हा ब्रँड विकसीत केला आहे. असेही मंत्री श्री. देशमुख यांनी सांगीतले. 
महाफॉर्म अंतर्गत काजूकाजू तुकडाकाजू पुर्णहळद पावडरकांदा लसून मसालेकाळा मसालेकोल्हापूरी मसाले असे विविध उत्पादने सहकारी भांडारमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच महाफॉर्मस या ब्रँडखाली राज्यातील सहकारी संस्थांचेबचत गटांच्या उत्पादनांचे मार्केटींग करण्याचे काम सुरू आहे. अलिकडेच महाफॉर्मची उत्पादने पंजाबमधील सहकारी भांडारमध्येही ठेवण्यात आली असल्याचेही श्री. देशमुख यांनी सांगितले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *