Pandharpur LIVE 3 March 2019
मुंबई- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाऑनलाईन सेवा या वेबसाईटच्या कामकाजाविषयी महाऑनलाईनचे मुख्य परिचालन अधिकारी प्रसाद कोलते यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत २, ४ आणि ५ मार्च रोजी राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक पुनम चांदोरकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महाराष्ट्र शासन आणि टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस यांचा संयुक्त उपक्रम असणा-या महाऑनलाईनची स्थापना,नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवा, महाऑनलाईनद्वारे राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीस करण्यात आलेली मदत, महाऑनलाईनला मिळालेले पुरस्कार आणि डिजिटल लॉकर आदी विषयाची माहिती श्री. कोलते यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com



