👁 7 Views

महिला दिनानिमित्त चंदुकाका सराफ यांचा अभिनव उपक्रम

Pandharpur LIVE 9 March 2019

चंदुकाका सराफ तर्फे महिला दिनापासून मिशन अद्या गेली १९० वर्षे शुद्धता परंपरा आणि विश्वास या त्रिसूत्रीच्या भक्कम पायावर उभ्या राहिलेल्या व निरंतर प्रगती करत असलेल्या चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडने महिला दिनापासून मिशन अद्या सुरु केले आहे. या अंतर्गत गरजू महिलांना दोन लाख मोफत सॅनिटरी नॅपकिन्स पुरवणचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे त्यात चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने १००००० नॅपकिन्स या मोहिमेसाठी दिले जाणार आहेत. महाराष्ट्रातील केवळ १७ टक्के स्त्रिया सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात बाकी अन्य मार्ग वापरून अनेक गंभीर आजारांना बळी पडतात . ही सामाजिक समस्या ओळखून चंदूकाका सराफ आणि सन्स प्रायव्हेट लिमिटेडने आतापर्यंत ज्याप्रमाणे विविध सामाजिक कामात सहभाग नोंदवला आहे त्याप्रमाणे ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचे आरोग्य सुधारावे हा उद्देश समोर ठेवून गरजू महिलांना दोन लाख मोफत सॅनिटरी नॅपकिन्स पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे .ज्यांना या मोहिमेत सहभाग द्यावयाचा असेल त्यांनी चंदूकाका सराफ आणि सन्स प्रायव्हेट लिमिटेड च्या शो रूम मध्ये ठेवलेल्या विशेष बॉक्स मध्ये नेऊन ठेवावे असे आवाहन चंदूकाका सराफ आणि सन्स प्रायव्हेट लिमिटेडच्यावतीने सिध्दार्थ शहा यांनी केले आहे.
  अधिक माहितीसाठी www.Iamaadya.inइन किंवा  ८००२६७०९९९ क्रमांकावर कॉल करावा .स्त्रीच्या उत्तम आरोग्यासाठी चंदूकाका सराफ यांच्यावतीने पाऊल उचलण्यात आले असून ‘पुढाकार घ्या, बना आद्या ‘,’मी आहे अश्या’ अशी मोहीम राबविण्यात येत आहे


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *