Pandharpur LIVE 10 March 2019
आधार कार्ड प्रशासनाने महा-ई सेवा केंद्राकडे असलेली सर्व यंत्रणा बंद करून पोस्ट कार्यालयाकडे दिल्या आहेत परंतु पोस्ट आॅफिसमध्ये फक्त दोनच तास वेळ आहे आणि एकच टेबल आहे.आज जागतिक महिला दिन असुन महिला भगिनींना आपल्या लहान मुलांना सोबत घेऊन आधार कार्ड काढण्यासाठी पोस्ट कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे हेलपाटे मारावे लागत आहेत.
हे पाहुन याविरोधात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने मुख्य व्यवस्थापक पोस्ट कार्यालय विभाग पंढरपूर यांना लेखी निवेदन दिले आणि येत्या दोन दिवसांत याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही आंदोलन उभं करु असा इशारा रासपचे पंकज देवकते यांनी दिला.
यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली भाऊ हळणवर,रासपचे संजय लवटे सर, संतोष शिरगिरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com




