Pandharpur LIVE 9 March 2019
सांगोला तालुक्यातील महुद येथील राष्ट्रीयकृत बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचा सर्व्हर व नेट बंद असल्याने देवाणघेवाण पुर्णत: गेल्या काही दिवसापासुन बंद असुन सर्वसामान्याचे व्यवहार ठप्प झाले आहेत तर बँकेचे एटीएम मशीन सुध्दा बंद असल्याने बँकेच्या ढिसाळ कारभाराबद्द्ल खातेदारातूंन संतापाची लाट उसळली आहे बँकेसमोर खातेधारकांची गर्दी असल्याचे दिसत आहे.वरिष्ठ अधिकाय्रांनी लक्ष देवुन प्रश्न सोडवावा अशी मागणी होत आहे.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com
महुद ता सांगोला येथे बँकेच्या समोर महिला वर्ग,शेतकरी,नागरीक इंटरनेट कधी सुरु होईल वाट पहात असल्याचे दिसत आहे.व्यवहार बंदमुळे बँकेसमोर खातेदारकांची गर्दी दिसत आहे.
~ मा संतोश येडगे
महुद
मी महुदच्या बँक आँफ महाराष्ट्र बँकेत पैसे काढण्यासाठी आलो होतो.नेट बंद असल्याने पैसे काढता आले नाहीत त्यामुळे बराच वेळ थांबुन रिकाम्या हाताने पैसे न घेताच परतलो.
~न्यानेश्वर वाघमोडे
बंडगरवाडी
कटपळ वरुन घरुगुती कामासाठी पैसे काढण्यासाठी आलो असता एटीएम मशीन बंद होती.त्यामुळे पैसे काढता आले नाहीत.बँकेतही व्यवहार ठप्प असल्याचे दिसुन आले.
~ बालाजी शिंदे
सामाजिक कार्यकर्ते कटपळ


