Pandharpur LIVE 13 March 2019
होऊ घातलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुंडगिरी व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून काही अनुचित प्रकार घडू नये आणी घडल्यास त्याला ताबडतोब उत्तर देता यावे म्हणून तालुक्यातील लक्ष्मी टाकळी या गावात दंगाकाबू योजने ची रंगीत तालीम घेण्यात आली.
ही रंगीत तालीम पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मी टाकळी गावात दंगा काबू योजनेचे प्रात्यक्षिके दाखविण्यात आले.
या दंगाकाबू योजनेचे उद्देश सामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होणे तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये धाक निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून होणाऱ्या निवडणुकीत निपक्षपाती आणि खुल्या वातावरणामध्ये निवडणूक पार पाडवी.
या रंगीत तालीममध्ये अग्निशमन, रुग्ण वाहिका व दंग्याच्या वेळेस लागणारे इतर साहीत्य ही आणले होते.
या रंगीत तालीम मध्ये ग्रामस्थांना सहभागी केले होते.
या दंगाकाबू प्रात्यक्षिके मध्ये पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव पोलिस उपनिरीक्षक इंगळे तालुका, शहर व ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचाऱ्यांचा आणि होमगार्ड व स्थानिक ग्रामस्थांचाही सहभाग होता.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com






