👁 10 Views

रणजितसिंह मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीला अखेरचा राम राम करुन घेतला भाजपात अधिकृत प्रवेश

Pandharpur LIVE 20 March 2019



अखेर रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी ला अखेरचा राम राम करुन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपात अधिकृत प्रवेश घेतला. कालच रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आणि आणि भाजपात प्रवेश घेतला. रणजितदादांच्या भाजपातील प्रवेशामुळे राष्ट्रवादीला फार मोठा फटका बसला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 



रणजितसिंह मोहिते-पाटील हे भाजपकडून माढ्यातील उमेदवार असणार आहेत, अशी माहिती आहे. माढ्यातून रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी विरोध केला होता. त्यामुळे आता रणजित सिंह मोहिते- पाटील यांनी भाजप प्रवेश केला. 


मुंबईतील गरवारे क्लब हाउसमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत आज हा प्रवेश सोहळा पार पडला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख यावेळी उपस्थित होते. मोदींच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतल्याचं रणजीतसिंह यांनी यावेळी सांगितलं.







रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मंगळवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजप प्रवेशाची घोषणा केली होती. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भरभरून कौतुक केलं. त्याचवेळी रणजितसिंह यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं. तर रणजितने केलेल्या घोषणेला माझी सहमती आहे, असं विजयसिंह मोहिते पाटील म्हणाले.

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *