Pandharpur LIVE 20 March 2019
रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये दाखल झाले असतानाच माढा मतदार संघातील जागेवर उमेदवार निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने बैठक आयोजित केली आहे. निवृत्त आयएएस अधिकारी प्रभाकर देशमुख व संजय शिंदे या दोघांपैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपला मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मागितली होती. अन्य मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले जात असतानाही माढाचे उमेदवार जाहीर केल जात नव्हते. उमेदवारी मिळणार नसल्याची शक्यता वाटल्याने रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
जरी रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये गेले तरी आम्ही चांगली उमेदवारी देण्यास सक्षम असल्याचा संदेश देण्यासाठी राष्ट्रवादीने आज ही बैठक आयोजित केल्याचे सूत्रांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यात अजितदादा पवार यांनी लक्ष घालून आ. बबनदादा शिंदे, त्यांचे भाऊ संजयमामा शिंदे, दीपक आबा साळुंके, प्रभाकर देशमुख असे शिलेदार निर्माण केले. माढा लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाचे प्राबल्य असून, त्यानंतर धनगर समाजातील मतदारांची याठिकाणी निर्णायक ताकद आहे. मध्यंतरी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या ताब्यातील चार सहकारी साखर कारखाने आणि दूध डेअऱ्या अशा संस्था आर्थिकदृष्ट्या डबघाईस आल्या होत्या. काही संस्थांवर जप्तीची कारवाई करण्याचे संकेत सहकार विभागाकडून गेले होते. त्यातच नाराज असलेले मोहिते पाटील कुटुंब लोकसभेसाठीसाठी तिकीट मिळत नसल्यामुळे रुसले होते. त्याचवेळी विजयसिंह मोहिते पाटील यांचे पक्षांतर्गत विरोधक असलेल्या गटांचे राजकीय बळ वाढत चालले होते.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com



