👁 8 Views

आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे स्मारकासमोर चंद्रभागा वाळवंटातील कचर्‍याची केली होळी

Pandharpur LIVE 20 March 2019

पंढरपूर (प्रतिनिधी):- आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे स्मारकासमोर चंद्रभागा वाळवंटातील कचर्‍याची होळी केल्याची माहिती महर्षी वाल्मिक संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली. होळी सणाचा मुळ उद्देश हा आपल्या सभोवतालची व आपल्या परिसराची स्वच्छता करुन पर्यावरणाचे रक्षण करणे हा असावा. या उद्देशाने आम्ही महर्षी वाल्मिकी संघाचे सर्व कार्यकर्ते दरवर्षी चंद्रभागेच्या वाळवंटाची स्वच्छता करुन जमा झालेल्या कचर्‍याची होळी आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे स्मारकासमोर करत असतो. यावर्षी सुध्दा हा उपक्रम राबवत आम्ही अनोख्या पध्दतीने होळीचा सण साजरा केला. अशी माहिती गणेेश अंकुशराव यांनी दिली.
पर्यावरणाचा होणारा र्‍हास हा संपुर्ण जगाला भेडसवणारा खुप मोठा प्रश्‍न आहे. वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे. होळी पेटविण्यासाठी मोठमोठ्या झाडांची बुंधे पेटविली जातात त्यामुळे ऐन होळीच्या सणामध्येच पर्यावरण दुषीत होत असते. चंद्रभागेचे वाळवंट स्वच्छ व्हावे व थोडासा पर्यावरणाचा र्‍हास थांबवण्यासाठी हातभार लागावा म्हणून महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने साजर्‍या केल्या जाणार्‍या या होळीच्या सणाची चर्चा सर्वत्र होत असून याचे कौतुक होत आहे.





होळी पेटविल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी पर्यावरण रक्षणाची, वृक्षारोपन व वृक्षसंवर्धन करण्याची व माणुसकीचे नाते अधिक दृढ करण्याची शपथ होळीच्या व आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या साक्षीनं घेतली. यावेळी संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव, रमेश नेहतराव, उत्तम परचंडे, गणेश तारापूरकर, संपत सर्जे, सुरज कांबळे, जयवंत अभंगराव, मंगेश अभंगराव, रणजीत कांबळे, अप्पा करकमकर, चंद्रकांत अभंगराव, पिंटु टाकळकर, सुहास कोरे, शरद कोरे, खंडु करकमकर, निलेश अभंगराव, गणेश कांबळे, पप्पु कोळी, देवा अभंगराव, राजाभाऊ परचंडे, कुमार संगीतराव, भैया पिंपळे, गुंडाप्पा परचंडे, मुकेश कडलासकर, बंटी कोताळकर, सुनील अभंगराव आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.    

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *