👁 13 Views

पंढरपूर सिंहगडच्या सुजितसिंह कोळेकर विक्रीकर निरिक्षक पदी निवड

 Pandharpur LIVE 27 March 2019

      पंढरपूर (प्रतिनिधी) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील कुमार सुजितसिंह कोळेकर यांनी विक्रीकर निरीक्षक व मंत्रालय सहाय्यक अशी दोन पदे मिळवून उज्ज्वल यश संपादन केले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
     कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण केलेल्या सुजितसिंह कोळेकर या माजी विद्यार्थ्यांने नुकत्याच झालेल्या लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत उज्ज्वल यश संपादन केले असुन विशेष म्हणजे विक्रीकर निरिक्षक व मंञालय सहाय्यक अशी पदे मिळविली आहे. सुजितसिंह कोळेकर यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडेमेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. रविंद्र व्यवहारे, डॉ. श्याम कुलकर्णी यांच्या हस्ते सुजितसिंह कोळेकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com 


विद्यार्थ्यांचा सर्वांगिंण विकास कसा होईल याकडे महाविद्यालयातील शिक्षक वर्ग जातीने लक्ष आहेत. प्राध्यापकांचा ज्ञानाचाअनुभव फायदा पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना होत आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना प्रकल्पधारीत शिक्षण दिले जात असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव मिळतो. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता सामाजिक बांधिलकीसामाजिक भान,राष्ट्राच्यासमाजाच्या हितासाठीउन्नतीसाठी व प्रगती कडे घेऊन जाणारे शिक्षण पंढरपुर सिंहगड मध्ये दिले जात आहे. त्यामुळे या महाविद्यालयातील विद्यार्थी आज प्रशासकीय क्षेत्रात विविध विभागात नोकरी मिळवीत आहेत. शिवाय महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे अनेक विद्यार्थी स्व:च्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करीत आहेत.
        विक्रीकर निरीक्षक व मंत्रालय सहाय्यक अश्या दोन परीक्षा उत्तीर्ण होऊन यश प्राप्त केल्याबद्दल सुजितसिंह कोळेकर यांचा प्राचार्य डॉ. कैलाश करांडेमेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. रविंद्र व्यवहारे, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. सचिन सोनावणे, प्रा. नंदकिशोर फुले, प्रा. समीर कटेकर, प्रा, अमित भादुले, प्रा. राहुल शिंदे, प्रा. महिंद्र काटकर सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *