बेळगाव: बेळगावमध्ये शेतात काढण्यात आलेल्या बोअरवेलमधून आगीच्या ज्वाळा बाहेर येताना दिसत आहेत. बेळगाव जिल्ह्यातल्या सोरगाव परिसरात हा अजब प्रकार पहायला मिळतोय.
भिमाप्पा गोलभावी यांच्या शेतात हा प्रकार घडला.
काही दिवस भिमाप्पांच्या शेतातली कूपनलिका बंद होती. पण गेल्या काही दिवसात वाढलेल्या थंडीमुळे काही शेतकरी त्याशेजारीचं शेकोटी पेटवून बसले. यावेळी अचानक या कूपनलिकेतून आगीच्या ज्वाला यायला लागल्या.
आगीच्या ज्वाला बाहेर पडत असल्याचे पाहून घाबरलेल्या शेतकऱ्यांनी पोलीसाना याची माहिती दिली . काही अतिउत्साही तरुणांनी बोअरवेलवर ठेवून भात शिजविण्याचे प्रात्यक्षिकही करून पाहिले . पोलिसांनी सदर घटना जिल्हाधिकारी आणी भूगर्भखात्याला कळविल्यावर त्यांनी प्रत्यक्ष शेतात जावून पाहणी केली
सध्या भूगर्भ विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले असून ते या जागेची तपासणी करत आहेत. या घटनेमागचं खरं कारण बाहेर येईलचं, पण तोपर्यंत भिमाप्पांच्या शेतात मात्र चांगलीच गर्दी पहायला मिळत आहे.