पठाणकोटमध्ये बॉम्ब निकामी करताना लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार शहीद

Loading

चंदीगड पंजाबच्या पठाणकोटमध्ये आयईडी स्फोटकाचा बॉम्ब निकामी करत असताना लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार शहीद झाले आहेत. त्यासोबतच काल दहशतवाद्यांशी लढताना 3 जवान जखमी झाले होते. त्यांचाही आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. पठाणकोट हल्ल्यात आतापर्यंत एकूण 7 जवानांना वीरमरण आलं आहे.
काल झालेल्या हल्ल्यानंतर अजूनही शोध मोहीम सुरु आहे. आणखी दोन अतिरेकी एअरफोर्स स्टेशनमध्ये असण्याची शक्यता आहे, अशी माहिती मिळते आहे.
दरम्यान अजूनही पठाणकोट एअऱफोर्स स्टेशनमध्ये दोन दहशतवादी दबा धरून बसले असल्याची माहिती डीआयजींनी दिली आहे. एअरफोर्स स्टेशनमध्ये आजही आईडीचे 2 स्फोट झाले आहेत. त्यात तीन जवान जखमी आहेत. एनएसजी आणि पोलीसांचं पथक एअरफोर्स स्टेशनच्या आत सर्च ऑपरेशन करतं आहे. काल पाच दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातलं होतं.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *