पुण्यातील तिन्ही विद्यार्थ्यांची नक्षलवाद्यांकडून सुखरुप सुटका

Loading

बस्तर :  नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या पुण्यातील तिन्ही विद्यार्थ्यांची नक्षलवाद्यांकडून सुखरुप सुटका केली आहे. तिघेही सध्या चिंतलनार पोलीस ठाण्यात असल्याचीही माहिती बस्तर पोलिसांनी दिली आहे.
भारत जोडो अभियानातील सायकल रॅलीत सहभागी होण्यासाठी गेलेल्या पुण्यातील तीन तरुणांचं नक्षलवाद्यांनी अपहरण केलं होतं. हे विद्यार्थी पुणे ते ओडिशा व्हाया छत्तीसगड दरम्यानच्या सायकल रॅलीत सहभागी झाले होते.  विकास वाळके, आदर्श पाटील आणि श्रीकृष्णा शेवाळे अशी या विद्यार्थ्यांची नावं आहेत.
हे विद्यार्थी 22 डिसेंबरला पुण्यातून सायकल चालवत छत्तीसगडमार्गे ओडिशात जाणार होते. मात्र  नक्षलवाद्यांनी या तीन विद्यार्थ्यांचं अपहरण केलं होतं.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *